आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाकडून पाणबुडीद्वारे सिरियावर पहिला हल्ला, ३०० ठिकाणांवर निशाणा साधला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को / पॅरिस - रशियाने सिरियातील अतिरेक्यांवर हल्ला करण्यासाठी पहिल्यांदाच पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्रे डागली आहेत. तीन दिवसांत जवळपास ३०० ठिकाणांवर निशाणा साधला.

राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन म्हणाले, पाणबुडीत अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रेही तैनात आहेत. त्याची गरज न पडलेलीच चांगली. रशियन पाणबुडी रोस्तोव ऑन दोन भूमध्य सागरातून सिरियातील दहशतवादी तळांवर कॅलिबर क्रूझ क्षेपणास्त्रे डागत आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की कॅस्पियन समुद्रातील आपल्या लष्करी तळावरून सिरियात १० क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यांच्याकडून जमीन, हवाई आणि सागरी क्षेत्रात सतत हल्ले करत आहे. रशिया ३० सप्टेंबरपासून सिरियामध्ये हवाई हल्ले करत आहे. यादरम्यान त्यांचे लढाऊ विमान तुर्की सेनेने पाडले होते. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू म्हणाले, पाणबुडीने हल्ला करण्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलला माहिती देण्यात आली होती. हल्ल्यावेळी पाणबुडी पाण्याच्या आतमध्ये होती. हवाई हल्लेही सुरूच आहेत. बाॅम्बवर्षाव करणाऱ्या टी-२२ विमानांनी तीन दिवसांत ६० उड्डाणे केली आहेत. या हल्ल्यात आयएसची रणनीतीची ठिकाणे, शस्त्र भंडार आणि तेल भांडार नष्ट झाले आहेत.

पुतीन केरींना भेटणार :
अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. ते सिरिया आणि युक्रेनच्या प्रश्नावरही त्यांच्याशी चर्चा करतील.