आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी भयानक हिंसा, ज्यात केवळ 100 दिवसात मारले गेले होते 10 लाख लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर सुरु झाले होते हे नरसंहार... - Divya Marathi
राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर सुरु झाले होते हे नरसंहार...
इंटरनॅशनल डेस्क- भारताचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि रवांडाचे पंतप्रधान अनासतासे मुरकेजी यांनी रविवारी रवांडा नरसंहार कांडातील पिडीतांना श्रद्धांजली वाहिली. आपल्याला माहित असेलच की, हामिद अन्सारी अफ्रिकन कंट्रीज युगांडा आणि रवांडाच्या दौ-यावर आहेत. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला रवांडा नरसंहाराबाबत सांगणार आहोत, जे आजपर्यंतचा जगातील सर्वात वाईट नरसंहार मानला जातो. हा नरसंहार एप्रिल 1994 मध्ये सुरु झाला होता, ज्यानंतर 100 दिवसात देशातील सुमारे 10 लाख लोकांना मारले गेले होते. राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर घडले होते हे नरसंहार...
 
- 6 एप्रिल 1994 रोजी रवांडाचे राष्ट्राध्यक्ष हेबिअरिमाना आणि बुरंडियनचे राष्ट्राध्यक्ष सिप्रेन यांची विमानावर बोर्डिंग करत असताना हत्या करण्यात आली होती. 
- त्यावेळी हुतु समुदायाचे सरकार होते. त्यांना वाटले की, ही हत्या तुत्सी समुदायाने घडवून आणली. 
- राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर दुस-या दिवसापासून संपूर्ण देशात यादवी पेटली. त्या दिवसापासून हत्याकांड सुरु झाले. हुतु सरकारने आपल्या जवानांनाही त्यात सहभागी होण्यास सांगितले.
- तत्कालीन हुतु सरकारने सामान्य लोकांसमवेत आपल्या जवानांनाही तुत्सी समुदायाच्या लोकांना मारण्याचा आदेश दिला. 
- या नरसंहारात काही दिवसात 80000 हून अधिक तुत्सी समुदायातील लोकांना ठार केले, तर काही देश सोडून गेले.
- नरसंहार सुमारे 100 दिवस चालले. यात मृत्यूचा आकडा 10 लाखांहून अधिक होता. यात मरणा-यात बहुतेक तुत्सी समुदायाचे लोक होते.
- त्याआधीही या दोन समुदायात वर्चस्वावरून हिंसक कारवाया होत होत्या. यानंतर थेट 10 लाख लोकांचे नरसंहारच घडले.
 
लहान मुलांना कापून रस्त्यावर फेकून दिले होते-
 
- या नरसंहाराने रवांडा देशाला बरबाद केले. लाखों परिवार नाहीसे झाले.
- हा नरसंहार इतका भयंकर होता की, आजही त्याची आठवण काढली तर लोकांना धक्का बसतो. 
- यात सर्वाधिक बळी लहान मुले आणि महिलांचे गेले. हजारों महिलांवर सामूहिक बलात्कार झाला होता. 
- महिला-पुरुषांना ठार मारलेच होते पण लहान मुलांनाही सोडले नाही. मुलांना कापून रस्त्यावर फेकून दिले जायचे.
- तुत्सी समुदायाच्या लोकांची हत्या करून त्यांची घरे-दारे लुटली होती. त्यानंतर त्यांना घरात पेटवून दिले होते.
 
बेल्जियमने केला होता रवांडावर कब्जा-
 
- 1918 पूर्वी रवांडाची स्थिती सामान्य होती. देश गरीब होता पण हिंसा होत नव्हती. 
- 1918 मध्ये बेल्जियमने रवांडावर कब्जा मिळवला. यानंतर या देशाची जनगणना करण्यात आली.
- बेल्जियम सरकारने रवांडांच्या लोकांसाठी ओळख सांगणारे कार्ड दिली.
- या ओळखपत्रात रवांडाच्या जनतेला तीन जातींत (हुतु, तुत्सी आणि तोवा) असे वाटले गेले. 
- विभाजनात हुतु समुदायाला रवांडातील उच्च जाती सांगत सरकारने त्यांना सरकारी सुविधा देण्यास सुरुवात केली.
- त्यामुळे तुत्सी समुदाय पेटून उठला. यादरम्यान दोन्ही समुदायांत वारंवार संघर्ष पेटत राहायचा.
- पश्चिमी देशांच्या मध्यस्थीने 1962 मध्ये रवांडा देश स्वतंत्र झाला व एक देश बनला.
- 1973 मध्ये हुतु समुदायाचे ‘हेबिअरिमाना’ रवांडात राष्ट्राध्यक्ष बनले. 6 एप्रिल 1994 रोजी त्यांच्या विमानावर हल्ला करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रवांडाच्या नरसंहाराला कारणीभूत ठरली. या जनसंहारात रवांडाची जवळपास 20 टक्के लोकसंख्या संपली होती.
 
अनेक महिला आताही आपल्या मुलांना मानत नाहीत स्वत:चे-
 
- नरसंहारदरम्यान हत्या-रेप यासारख्या घटनेने संपूर्ण लोकांत दहशत होती.
- आजही तेथे हजारों महिला एड्सने पीडित आहे. अनेक महिला जन्माला घातलेल्या मुलाला स्वत:चे, आपले मुल मानत नाहीत.
- त्यांचे म्हणणे आहे की, ही मुले त्या गुंड लोकांची आवलाद आहे, ज्यांनी आमचे कुटुंबे उद्धवस्त केली.
- मात्र, आता हळू हळू देशाची परिस्थिती सुधारत आहे. अनेक देशांतील समाज सेवी संस्था तेथे काम करत आहेत.
- सध्याच्या सरकारालाही पश्चिमी देशांची आर्थिक मदत मिळत असते ज्यामुळे देशाचा विकास होत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
 
(pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...