आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नरसंहारात वाहिले रक्ताचे पाट, विखुरले होते मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सब्रा व शातिला नरसंहाराला 34 वर्ष झाली. मात्र या काळ्या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत. 1982 मध्‍ये लेबनॉनी दहशतवाद्यांनी 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान बेरुतमध्‍ये राहत असलेल्या निर्वासित पॅलेस्टीनिनांचे कत्तली केल्या होत्या. या नरसंहारात साडेतीन हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले होते. या घटनेला लेबनानचा प्रमुख कताएब पक्षाशी संबंध असलेली दहशतवादी संघटना व इस्रायल लष्‍कराला जबाबदार धरण्‍यात आले आहे. लेबनानच्या या उजव्या पक्षाला फलान्जिस्ट या नावानेही ओळखले जाते. दोन्ही कॅम्पमध्ये झाला होता नरसंहार...
ही लेबनानमधील 1982 मध्‍ये इस्रायल लष्‍कराने केलेल्या हल्ल्याच्या काळातील घटना आहे. या हल्ल्याचा उद्देश पॅलेस्टाइन स्वातंत्र संघटनेची पळेमुळे उपटून काढणे हेे होते. इस्रायली सैन्याच्या इशा-यावर लेबनॉनच्या दहशतवाद्यांनी बेरुतच्या दोन निर्वासित कॅम्प सब्रा व शातिलामध्‍ये तीन दिवस लोकांवर अत्याचार केला. महिलांवर बलात्कार करण्‍यात आलेे, अनेकांची हत्या केली गेली. मृतांमध्‍ये महिला, मुले आणि वृध्‍दांचा समावेश होता. यात बहुतेक पॅलेस्टाइन व लेबनॉनी शिया होते.

हत्येचा बदला घेतला
या नरसंहाराला लेबनॉनचे नवनिर्वाचित राष्‍ट्रपती बचीर गेमायल यांची हत्याचा बदला म्हणून पाहण्‍यात येते. ते लेबनॉन कताएब पक्षाचे होते. या नरसंहाराच्या पहिल्या आठवड्यात गेमायल व त्यांच्या 25 समर्थकांचे बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला होता. फलान्जिस्ट या फोस्टांच्या मागे पॅलेस्टीनी बंडखोरांचा हात असल्याचे मानत होते. यामुळे पॅलेस्टाइन निर्वासितांच्या कॅम्पमध्‍ये हा कत्तली केल्या गेल्या.
इस्रायली नेत्यांवर संशय
1983 मध्‍ये इस्रायलच्या चौकशी आयोगाने इस्रायली नेत्यांना या नरसंहारासाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार ठरवले होते. यात इस्रायलचे तत्कालीन संरक्षणमंत्री एरियल शेरॉनही सहभागी होते. नंतर शेरॉन इस्रायलचे पंतप्रधान झाले. त्यांच्या सांगण्‍यावरुन हा नरसंहार करण्‍यात आला होता. आयोगाने शेरॉन यांना नरसंहार न रोखल्या प्रकरणी जबाबदार ठरवले होते.
पुढील स्लाइड्स पाहा या नरसंहारचे काही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...