आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी आठ मिलिमीटर आशेवर जीवन जगतोय, डेव्हिडच्या मणक्यात ट्यूमर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- सायकलपटू डेव्हिड स्मिथ. २०१२ लंडन पॅराऑलिम्पिकचा (विकलांगांची ऑलिम्पिक) सुवर्णपदक विजेता. त्याला २०१६ रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा ध्यास आहे. मात्र, त्याला मणक्याचा कर्करोग आहे. ट्यूमर मणक्यापासून अवघ्या ८ मिलिमीटरपर्यंत आला आहे. शस्त्रक्रियेविना प्राण वाचणे अशक्य असूनही त्याने नकार दिला आहे. रुग्णालयाऐवजी मैदानावर जगण्याची डेव्हिडची (३७) जिद्द आहे. डेव्हिड आधी पॅराऑलिम्पिक रोइंग संघाचा सदस्य होता. दुर्मिळ ट्यूमर निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली, नंतर सुवर्णपदकही जिंकले. मग तो सायकलिंगमध्ये आला. आता अचानक ट्यूमर पुन्हा उमाळला आहे. यावेळी अधिक भयावह आणि जीवघेणा. त्याने चाहत्यांना ईमेल पाठवला. त्याला शीर्षक दिले ‘द रेस दॅट आय मस्ट विन.’ वाचा...

माझा ट्यूमर माझ्यापेक्षा जास्त बलवान असू शकत नाही. नि:संशय, मी अश्रूंत बुडालो आहे, पण हेच अश्रू मला जिंकवतील. मी ऑपरेशन केले तर जिवंत राहण्याची ५०० पैकी एकच शक्यता आहे. माझा मणका निकामी होईल, फुप्फुसे काम करणे बंद करतील. कायमचा पक्षाघात होऊ शकतो. शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरीही ट्यूमर उमाळण्याची शक्यता ६८% आहे. सर्जन सांगतात, आता माझे सायकलिंग करिअर संपले आहे. पण मला ते साफ अमान्य आहे. तुम्ही पाहालच, मी सुवर्ण जिंकून दाखवेन. आजाराला कसे हरवले जाते हे तेव्हा मी सर्वांना सांगेन. मी पुढील ११ महिने रिओत सायकलिंगचे स्वप्न साकारण्यासाठी आयुष्याला हरवण्यास सज्ज आहे. मला आशा आहे, हा ट्यूमर मला आणखी एक वर्ष आयुष्याचा आनंद व प्रशिक्षण घेण्याची संधी देईल. मित्रांनो, मी तुमच्यावर किती प्रेम करतो, हे मी माझ्या चाहत्यांना सांगू शकेन ही नाही, हे मला आज ठाऊक नाही. माझ्या आयुष्याचा भाग बनल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. कृपया हे वाचल्यानंतर मनाशी एक ध्येय बाळगा, त्याचा पाठलाग करा. मित्राला सांगा की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांना सांगा की तुमचा त्यांच्यावर अत्यंत जीव आहे.
- तुमचाच डेव्हिड स्मिथ.