आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salil Shetty Address To Sustainable Development Summit 2015

VIDEO : यूएनमध्‍ये पंतप्रधान मोदींसोबत या भारतीयाने दिले रोखठोक भाषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युनाइटेड नेशन्समध्‍ये (यूएन) शास्‍वत विकासासाठी आयोजित बैठकीला संबोधित केले. नंतर त्‍यांनी श्रीलंका, भूटान आणि इजिप्‍तच्‍या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. मात्र, मोदी यांच्‍या शिवाय आणखी एका भारतीय व्‍यक्‍तीने यूनाइटेड नेशंसच्‍या Sustainable Development Summit 2015 मध्‍ये भाग घेतला. एवढेच नाही तर आपले रोखठोक विचारही मांडले. ती व्‍यक्‍ती म्‍हणजे मानहक्‍कासाठी काम करणारे अमनेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस सलिल शेट्टी आहेत. त्‍यांनी मोदी यांच्‍या अगोदर या बैठकीत भाषण दिले.
मोदी यांच्‍या भाषणातील महत्‍त्‍वाचे मुद्दे
- गरिबी असेल तर शांततापूर्ण जग, न्यायपूर्ण व्यवस्था आणि शाश्वत विकास शक्यच नाही. दारिद्र्य निर्मूलन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

- भारताने स्वीकारलेला विकासाचा मार्ग आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांत खूपच साम्य आहे.

- गरिबांना शिक्षण मिळावे आणि त्यांच्याकडे कौशल्य असावे, या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आर्थिक समावेशकतेचा विडा उचलला आहे.

- आम्ही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा मंत्र घरोघरी दिला आहे. स्मार्ट, जिवंत विकास केंद्रे म्हणून शहरांचा विकास केला जात आहे.

शेट्टींच्‍या भाषणातील मुद्दे
- जर यूएन जनरल असेंबलीला आपले उद्दष्ट‍ि्य साध्‍य करायचे असेल तर तत्‍काळ आपल्‍या निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. एवढेच नाही तर आपली जबाबदारीही निश्चित करावी लागणार आहे.
- ज्‍या लोकांसाठी योजना आखल्‍या जातात त्‍यांनाच विकासाचा फायदा व्‍हायला व्‍हावा
- आपण ज्‍या जगाचे स्‍वप्‍न पाहात आहोत, वास्‍तव्‍यात जग तसे नाही. स्‍वप्‍न आणि वास्‍तव यात खूप फरक आहे. तुर्कस्‍थानाच्‍या किनाऱ्यावर तीन वर्षीय अयलान कुर्दी या बालकाचा मृतदेह आढळल्‍यानंतर सारे जग हादरले. यातून बरेच काही शिकण्‍यासारखे आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...