आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरू: पर्वतात मिठाची शेती, विक्री 1200 रुपये प्रतिकिलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिमा- हे छायाचित्र आग्नेयेकडील शहर कुस्को येथील मारस पर्वताचे आहे. हा पर्वत इंका सॅक्रेड खोऱ्यात समुद्र सपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर आहे. येथील लोक पर्वतावर लहान-लहान तलाव बनवून त्यात मिठाची शेती करतात. त्यांना मिठाच्या खाणी असेही म्हटले जाते. जेव्हा या तलावांवर संध्याकाळी सूर्याची किरणे पडतात तेव्हा हा पर्वत आणखी सुंदर दिसतो. हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जगभरातून लोक येतात. २०१३ मध्ये १२ लाख लोक आले होते.

अॅमेझॉनवर  २५० ग्रॅम मिठाची किंमत ३१५ रुपये
- हे मीठ पूर्णपणे नैसर्गिक असते. अॅमेझॉनवर २५० ग्रॅम मीठ ५ डॉलरमध्ये (सुमारे ३१५ रु.) विकले जात आहे. म्हणजे १२६० रुपये किलो.
- पेरूत २००-९०० ईसवी सन पूर्वीपासून पर्वतात मिठाची शेती होते. तेथे ५ हजार तलावांत शेती होत आहे. माचू-पिचूच्या पर्वतावरही अशीच शेती होते.
- या तलावांत येण्यासाठी पर्यटकांना २०० रुपये द्यावे लागतात. २०१६ मध्ये सुमारे २० लाख पर्यटक आले होते. पाच वर्षांत १० लाख पर्यटक वाढले आहेत.

४१ देशांत प्रवास, पण येथील खाणी सर्वात वेगळ्या
छायाचित्र ‘हाऊ फॉर फ्रॉम होम’ ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट केले आहे. ट्विटर हँडलरने लिहिले, ‘अडीच वर्षांत ४१ देश फिरलो. धबधबे, बंदरे पाहिली. पण या खाणी सर्वात वेगळ्या आहेत.’
बातम्या आणखी आहेत...