आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samra Kesinovic, Who Left Home In April 2014 Was Killed

ISISच्या पोस्टर गर्लची निर्घृण हत्या; सीरियातून पळून जाण्याचा करत होती प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का- दहशतवादी संघटना ISIS (इस्लामिक स्टेट) ची पोस्टर गर्ल समरा केसिनोविकची (17) दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे. समराला दहशतवाद्यांना 2014 पासून वेठीस ठेवले होते. ISIS समराचा पोस्टर गर्ल म्हणून वापर करत होता. समरा सीरियातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, समराचा प्लान दहतवाद्यांना समजताच त्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

समरा व तिची मैत्रिण सबीना सेलिमोविक हिला ISIS ने एप्रिल 2014 पासून वेठीस ठेवले होते. दोन्ही ट्यूनिशियाच्या राहाणार्‍या होत्या. ISIS दोघींचा वापर पोस्टर गर्ल म्हणून करत होता.

असा झाला खुलासा...
'द लोकल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ट्यूनिशियाची रहिवासी समरा व सबीना या दोघी रक्कामध्ये राहात होत्या. 2014 पासून दोघी ISISच्या ताब्यात होत्या. समरा पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, समराचा प्लान दहशतवाद्यांना समजताच त्यांनी तिची हत्या केली. सबीना सेलिमोविकची तर दहशतवाद्यांनी आधीच हत्या केली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ISIS ने जारी केलेले फोटोज...