आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरीप्रकरणी Samsangच्या उपाध्यक्षांना अटक, कंपनीने फेटाळले आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियोल- लाचखोरीप्रकरणी सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स कंपनीचे उपाध्यक्ष ली जे योंग यांनी शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. साऊथ कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्यून हेई यांना 40 मिलियन डॉलरची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा योंग यांच्यावर आरोप आहे.

दोन कंपन्यांच्या विलिनीकरणासाठी योंग यांना कार्क ग्यून हेई यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, कंपनीच्या उपाध्यक्षांना अटक झाल्याने सॅमसंगच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ही जगातील सर्वात मोटी स्मार्टफोन आणि मेमरी चिप निर्माता कंपनी आहे. कंपनीने कोणालाही लाच देण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच कोरियाच्या अध्यक्षाकडूनही कधीच अपेक्षा केली नसल्याचे सॅमसंगने म्हटले आहे.

दरम्यान, लाचखोरीप्रकरणी सॅमसंगच्या एका बड्या अधिकार्‍याच्या विरोधातही अटक वॉरंट काढण्यात आले आहे. साऊथ कोरियाच्या अर्थव्यवस्थेतही सॅमसंग कंपनीची मोठे योगदान आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...