आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bull Race : हात पाय मोडले तरी चेहऱ्यावर हसू, पाहा अनोखा उत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रीद - फोटोत दिसणारे दृश्य हे स्पेनच्या पॅम्पलोना शहरात होणाऱ्या वार्षिक 'सॅन फर्मिन फेस्टीव्हल'चे आहे. तसे पाहता या ठिकाणी अनेक उत्सव साजरे केले जातात. पण सर्वात जास्त चर्चा असते ती याठिकाणी होणाऱ्या बुल रेस ची या शर्यतीमध्ये अनेकांचे हात-पाय मोडणे, जखमी होणे असे प्रकार होत असतात. पण तरीही लोकांच्या चेहऱ्यावर हसू कायम राहते. नऊ दिवस चालणारा हा उत्सव सुरू करण्याचे श्रेय साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे यांना जाते.
मंगळवारी येथे अत्यंत धोकादायक अशा बुल रेसचे आयोजन करण्यात आले होते. 850 मीटर लांब आणि अरुंद रसत्यावर शेकडो तरुणांनी बैलांसमोर आपली हिम्मत दाखवली. या दरम्यान अनेक तरुण गंभीर जखमीही झाले. त्यापूर्वी सोमवारी या उत्सवाला सुरुवात झाली. त्यावेळी पॅम्पलोना स्क्वेअरवर हजारो तरुण एकत्र जमले. त्यांनी हवेत वाइन फेकत धमाल केली. १३ जुलै रोजी रात्री दोन वाजता या उत्सवाचा समारोप होईल.

स्पेनची ही 'बुल रेस' संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. यात परदेशी पाहुण्यांचीही चांगलीच गर्दी होत असते. या रेसमध्ये सहभागी होण्यापूर्वी तरुण डान्स करून आनंद साजरा करतात. त्यानंतर एक ठिकाणी एकत्र येऊन बैलांना डिवचले जाते. त्यानंतर जे काही होते, ते सर्वांनाच माहिती आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, उत्सवाशी संबंधित PHOTOS