आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अमेरिकेत झाला होता मोठा भूकंप, सर्वत्र लागली होती आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 एप्रिल1906 रोजी सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्‍टर स्केल होती. - Divya Marathi
18 एप्रिल1906 रोजी सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्‍टर स्केल होती.
जपानमध्‍ये प्रत्येक दिवशी छोटे-मोठे भूकंपाचे हादरे बसत असतात. रविवारी (ता.17) येथे भूकंपाचे 21 हादरे बसले होते. त्यांची तीव्रता 7.1 रिश्‍टर स्केल होती. अशीच घटना 110 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को मध्‍ये घडली होती. यात निम्म्यापेक्षा जास्त शहर उद्ध्‍वस्त झाले होते. आण्विक हल्ल्याप्रमाणे होती परिस्थिती...
- 18 एप्रिल 1906 च्या सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी आलेल्या या भूकंपची तीव्रत 7.8 रिश्‍टर होती.
- क्षणात हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या. मात्र सर्वाधिक धोका शहरात लागलेल्या आगीची होती.
- लांबून पाहिल्यावर वाटत होते, की शहरावर आण्विक हल्ला झालायं.
- शहरातील अनेक भाग कैक दिवस जळत होते. जवळजवळ 500 सिटी ब्लॉक्स जळून खाक झाले होते. 25 हजार इमारतींचे नुकसान झाले होते.
- चार लाख लोकसंख्‍या असलेल्या शहरात दीड लाख लोक बेघर झाले. मात्र आजही या आकड्याबाबत खात्री नाही.
- दुसरीकडे शासकीय आकड्यांनुसार तीन हजारापेक्षा जास्त लोकांची या दुर्घटनेत मृत्यू झाला.
भूकंपाच्या घटना का होतात?
- पृथ्‍वीच्या आत सात प्लेट्स आहेत, जे सतत फिरत असतात. जेव्हा हे प्लेट्स एकमेंकांना धडकतात तेव्हा त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात.
- सतत धडकल्याने प्लेट्सचे कोन वळतात. जेव्हा जास्त दबाव तयार होतो तेव्हा प्लेट्स टुटली जातात.
- खालची ऊर्जा बाहेर येण्‍याचा मार्ग शोधते. डिस्टर्बन्सनंतर भूकंप येतो.
रिश्‍टर स्केलवर किती परिणाम
- 0 ते 1.9 फक्त सिझ्मोग्राफमधून कळते.
- 2 ते 2.9 हलकेसे कंपण
- 3 ते 3.9 एखादा ट्रक तुमच्या जवळून गेल्याचा परिणाम.
- 4 ते 4.9 खिडक्या तुटू शकतात. भिंतीवर लटकवलेली फ्रेम पडू शकते.
- 5 ते 5.9 फर्निचर हलू शकते.
- 6 ते 6.9 इमारतींचा पायाला तडे जाऊ शकते. वरच्या मजल्यांना नुकसान पोहोचू शकते.
- 7 ते 7.9 इमारती पडू शकतात. भूमीगत नळ फुटू शकतात.
- 8 ते 8.9 इमारतींसह मोठे पुलही पडू शकतात. सुनामीचा धोका असतो.
- 9 आणि त्याच्यापेक्षा जास्त रिश्‍टर स्केलमुळे मोठा हाहाकार माजू शकतो. कोणी मैदानात उभा असेल तर त्याला जमीन तरंगल्यागत दिसेल. समुद्र जवळ असेल तर सुनामीची शक्यता असते. भूकंपामध्‍ये रिश्‍टरनुसार प्रत्येक धक्का दुस-या धक्क्याच्या तुलनेत 10 पटीने शक्तिशाली असतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...