ब्रिस्बेन- गातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीस यंदाच्या नव्या सत्राला किताबाने सुरुवात करण्यासाठी सज्ज अाहेत. यासाठी ही जाेडी सत्रातील पहिल्या टेनिस स्पर्धेतील अजिंक्यपदापासून अवघ्या एका पावलावर अाहे. त्यांनी शुक्रवारी ब्रिस्बेन अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.
अव्वल मानांकित सानिया-मार्टिनाने महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात स्लाेव्हाकियाची अांद्रेजा क्लेपाक व रशियाची अला कुद्रायत्सेवाला ६-३, ७-५ अशा फरकाने पराभूत केले.
अझारेंका, केर्बर अंतिम चारमध्ये : बेलारूसची व्हिक्टाेरिया अझारेंका व इटलीच्या केर्बरने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अझारेंकाने राॅबर्ट व्हिन्सीला ६-१, ६-२ ने हरवले.केर्बरने सुअारेझवर मात केली.
स्विसकिंग राॅजर फेडरर उपांत्य फेरीत
स्विसकिंग फेडररने पुरुष एकेरीची सेमीफायनल गाठली. त्याने उपांत्यपूर्व फेरीत ग्रिगाेर दिमित्राेवचा पराभव केला. त्याने ६-४, ६-७, ६-४ ने विजय मिळवला.