साउ पाउलो- ब्राझीलमध्ये सरकार विरोधात मोठा जनक्षोभ उसळला आहे. सरकार विरुद्ध सुरु झालेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातील जवळपास 150 शहरांत 30 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. साओ पाउलो शहरात सर्वात जास्त प्रभाव दिसत आहे. पाच लाख लोक साओ पाउलो शहरात रस्त्यावर उतरले आहेत. ब्राझीलच्या इतिहासात हे सर्वात मोठे आंदोलन आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अध्यक्ष डिलमा रॉसेफ यांना पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
25 वर्षात सर्वात गंभीर परिस्थिती, जीडीपी घसरला
- रॉसेफचे सल्लागार लुइज सिल्वा यांच्याविरुद्ध मनी लॉडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- रॉसेफ व त्यांच्या अलायन्स पार्टीवर अब्जो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
- बिझनेसमध्ये 40 टक्क्यांनी घट दिसून आली आहे. अर्थव्यवस्थेत 25 वर्षांनी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
- जीडीपी -1.4 टक्क्यांवर आला आहे. वाढती महागाई व बेरोजगारीमुळे देशातील जनता त्रस्त आहे.
ऑलिंम्पिकवर दिसेल परिणाम?
- ऑगस्ट महिन्यात रियो डी जेनेरियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिक गेम्सवर जनक्षोभचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
- दरम्यान, संरक्षण मंत्री एल्बो रिबेलो यांनी ऑलिम्पिक दरम्यान 85 हजार जवान तैनात करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले डिल्मा रॉसेफ?
मी राजीनामा देणार नाही. जनतेकडे मला पदावरून हटवण्यासाठी कोणताही ठोस आधार नसल्याचे ब्राझीलचे अध्यक्ष डिल्मा रॉसेफ यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, ब्राझीलमध्ये सरकार विरोधात उसळलेल्या जनक्षोभचे फोटो...