आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात 50 लाख वेळा सराहा अॅप डाऊनलोड; तिघा जणांकडून लाँचिंग, युजर्समध्ये लोकप्रिय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- सौदी अरेबियात तयार केलेले सराहा जगभरातील युजर्समध्ये लोकप्रिय ठरले आहे. साधारण महिनाभरापूर्वी लाँच झालेले हे अॅप ५० लाखांपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड  केले आहे. विशेष म्हणजे केवळ तिघांनी अॅप बनवले आहे. यामध्ये २९ वर्षीय जेन अल अबिदीन तौफिक व त्याच्या दोन मित्रांचा समावेश आहे.
  
या अॅपच्या माध्यमातून युजर अापल्या प्रोफाइलशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला संदेश पाठवू शकतो. मात्र, त्याच वेळी संदेश प्राप्त करणाऱ्यास तो कुणाकडून आला हे कळणार नाही. त्याला उत्तरही दिले जाऊ शकत नाही. याच कारणामुळे अॅप लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. सराहा अरबी शब्द असून त्याचा अर्थ प्रामाणिकपणा असा होताे. 

तौफिक म्हणाला, या माध्यमातून एखादा कर्मचारी, बॉस किंवा सीनियरकडे न संकोचता मत प्रदर्शित करता येते हा अॅपचा मुख्य उद्देश आहे. समोरासमोर बोलू शकणाऱ्या सर्व गोष्टी युजर एखाद्याला सांगू शकेल. संदेशातील आशय एखाद्याला खटकूही शकतो. अॅप हजारावर डाऊनलोड होईल, अशी आशा तौफिकला होती. मात्र, गुगल प्ले स्टोअरवर आतापर्यंत ५० लाखांहून जास्त डाऊनलोड झाले आहे. अॅप इंग्रजी व अरबी भाषेत वापरता येत असून ते आयओएस व गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सराहा अॅप या वर्षी फेब्रुवारीमध्ये वेबसाइटम्हणून लाँच झाले होते. लाँचिंगच्या महिन्यानंतर इजिप्तमधील युजर्सची संख्या २५ लाख, साैदीत १२ लाख व ट्युनिशियात १७ लाखांवर पोहोचली आहे. 

सायबर सुरक्षा धोक्यात येऊ शकते : तज्ज्ञांचे मत
या अॅपमुळे ‘सायबर बुलिंग’चा धोका वाढू शकतो. नकारात्मकताही वाढू शकते. या अॅपला फेसबुक व स्नॅपचॅटपेक्षा जास्त प्राधान्य दिले जात असल्याचा दावा आहे. अॅप भारताच्या सुरक्षेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. फेसबुक व टि्वटरसारख्या प्लॅटफॉर्मने ट्रोलिंग व बुलिंगला प्रोत्साहन दिले आहे. ट्रोलिंग रोखण्यासाठी कंपन्यांनी योग्य उपाय योजले नाहीत तसेच कठोर कायदाही केला नाही. या साइट्सवर युजरची माहिती असते. मात्र, तरीही बनावट आयडीने ट्रोलिंग वाढत आहे.
बातम्या आणखी आहेत...