आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी गमावून ती झाली रोजगार देणारी राणी, नोकरीहून काढणाऱ्या बॉसचे मानले आभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - तिला एका आठवड्यात दोनदा नोकरीवरून काढले. एकदा तर बॉसने तिला लंचवरून येण्यास पाच मिनिटे उशीर झाला म्हणून काढून टाकले. अशा अनेक नोकऱ्या गमावल्यानंतरही तिने हार मानली नाही. तिने टायपिंग स्कूल सुरू केले. आज ती एका कंपनीची मालक आहे. युवकांना रोजगार शोधून देण्यासाठी ही कंपनी मदत करते. ती आज ऑस्ट्रेलियातील सर्वश्रीमंत महिला असून कंपनीची उलाढाल ६ अब्ज ६७ कोटींची आहे. सारिना रुसो आज ६६ वर्षांच्या आहेत. युवा पिढी तिला नोकरी देणारी राणी, असे संबोधतात. सारिना आपल्या या यशाचे श्रेय आपल्याला आलेल्या अपयशांनाच देते. नोकरीवरून काढणाऱ्या आपल्या अनेक बॉसचेही ती आभार मानते. यामुळेच ती स्वत:चे स्कूल उघडू शकली. सारिनाने ‘मीट मी अॅट द टॉप’ या पुस्तकात या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. उधार पैसे घेऊन सारिनाने शिक्षण घेतले. याची आठवणही ती सांगते.

पुढे वाचा... कंपनीत १ हजाराहून अधिक कर्मचारी
बातम्या आणखी आहेत...