आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हेर कुलभूषण जाधवविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे नाहीत : पाकिस्तान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सिनेट चेंबरमध्ये खासदारांना माहिती देताना नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजिज यांनी सांगितले की, जाधवने केवळ जबाब दिला आहे. पण त्याशिवाय आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही.

इस्लामाबाद - अटक करण्यात आलेला भारतीय हेर कुलभूषण जाधवच्या विरोधात पाकिस्तानकडे ठोस पुरावे नसल्याचे म्हटले आहे. जाधवला पाकिस्तानने बलुचिस्तानातून अटक केली होती. जाधव एक व्यावसायिक असून तो ईराणमध्ये व्यवसाय करत असल्याचे भारताकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते. जाधवचे अपहरण झाले असल्याची शक्यताही भारताने व्यक्त केली होती.

आणखी काय म्हणाले अजिज...
- पाकिस्तानी टिव्ही चॅनल जियोच्या वृत्तानुसार अजिज बुधवारी सिनेटच्या चेंबरमध्ये खासदारांना ब्रीफ करत होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, जाधवने केवळ जबाब दिला आहे. पण त्याशिवाय आमच्याकडे काहीही ठोस पुरावा नाही.
- भारताला सादर केले जाणारे पुरावेही पुरेसे नसल्याचे त्यांनी सांगितले. जाधवच्या विरोधात पुरावे मिळवायला किती वेळ लावायचा ही आता गुप्तचर संस्थांची जबाबदारी आहे.
पाकिस्तानने जारी केला होता, जाधवच्या कबुलीजबाबाचा व्हिडीओ
- पाकिस्तान आर्मीने मार्चच्या अखेरीस जाधवचा कबुलीजबाबाचा व्हिडीओ सादर केला होता. त्यात आपण बलुचिस्तानात दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचे त्याने मान्य केले होते. भारताने हा व्हिडीओ पेटाळून लावत जाधवला इराणमधून अपहरण झाल्याचे म्हटले होते.

पाकिस्तानचे दावे...
- पाकिस्तानी आर्मीने दावा केला होता की, जाधव बलुचिस्तानात रॉसाठी काम करत होता.
- जाधव, इंडियन नेव्हीचा सर्व्हींग ऑफिसर आहे. त्याचा थेट रॉ प्रमुखांची संपर्क असतो. तो एनएसएच्या संपर्कातही आहे. तुमचा मंकी (हेर) आमच्या ताब्यात आहे. रॉबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा कोडही त्याने सांगितला आहे. जाधव अजूनही इंडियन नेव्हीचा अधिकारी आहे. तो 2022 मध्ये निवृत्त होणार आहे.

जाधवने व्हिडीओमध्ये काय म्हटले होते...
- जाधवच्या मते, डिसेंबर 2001 पर्यंत तो इंडियन नेव्हीमध्ये होता. संसदेवरील हल्ल्यानंतर त्याने हेरगिरी केली होती. 2003 मध्ये त्याने इंडियन इंटलिजेन्स सर्व्हीस जॉइन केली.
- तो इराणमधून बलुचिस्तानात दहशतवादी कारवायांना मदत करत होता, असेही त्याने सांगितले.
- जाधवच्या जबाबानुसार तो 2013 मध्ये रॉमध्ये आला. इराणच्या चाबहार परिसरात 10 वर्षांपूर्वी रॉचा बेस बनवला. कराची आणि बलुचिस्तानचा दौरा केला.
- तो नेव्हीतून 2022 ला निवृत्त होणार आहे, असेही त्याने सांगितले. में रिटायर होना है।

आईच्या नावावर फ्लॅट..
- जाधवचा एक पासपोर्ट 2014 मध्ये मुंबईच्या ठाण्यातून जारी करण्यात आला होता. त्याचा क्रमांक L9630722 आहे.
- या पासपोर्टवर जसदनवाला कॉम्पलेक्स ओल्ड मुंबई-पुणे हा पत्ता आहे.
- म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या रेकॉर्ड्सनुसार ज्या फ्लॅटमद्ये तो राहत होता तो त्याची आई अवंतीच्या नावावर रजिस्टर्ड आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...