आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 9 हजार वर्षे जुन्या गुहांमध्‍ये आजही येथे राहतात लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- फ्ल‍िंटस्टोन, असे कार्टून पात्र ज्याचे विश्‍व दगडांच्या आसपास वसले होते. तुम्हाला आठवते ही कार्टुन सीरीज? हो, असेल तर तुम्हाला दगडांपासून बनलेल्या संपूर्ण गावाचे चित्र समोर येईल. फ्ल‍िंटस्टोनचे ते गाव वास्तवातही आहे. दक्षिण इटलीच्या या प्राचीन गाव 'सास्सी डी मटेरा' या नावाने ओळखले जाते. हे गाव बॅसिलिकेट प्रांतात आहे. हे जगातील सर्वात जुने गुहांचे शहर म्हणून प्रसिध्‍द आहे. सर्वात आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे आजही लोक गुहांमध्‍ये राहतात. आज येथे जगभरातून पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी या गुहांमध्‍ये हॉटेल आणि रेस्तरॉंही आहेत. असे सस्सी डी मटेरा...
 
- पाषाण युगाची आठवण करुन देणा-या या 9 हजार वर्ष जुने गावाला इटलीतील सर्वात पहिले मानवी बनावटीचे मानले जाते. 
- युनेस्कोने संरक्षित केलेल्या हे गाव इटलीच्या मटेरा शहराचा भाग आहे. येथील पर्वतांमध्‍ये असंख्‍य गुहा आहेत. ती नदीच्या प्रवाहामुळे बनले आहे. 
- गुहेत राहणा-या लोकांनीच येथे चहुबाजूने गल्ल्या आणि शिड्या उभारले, जी आजही आहेत. 
- येथे राहणारे लोक भले 20 व्या शतकातील असो, मात्र आजही त्यांची राहणीमान पूर्वी सारखीच आहे. 
- या गुहेप्रमाणे असलेल्या घरात ना पाणी पोहोचते ना सांडपाण्‍याची सुयोग्य सुविधा आहे. वीजही नेहमी गायब असते. 
- आहे त्या स्थितीत येथे राहणा-या लोकांची संख्‍या वाढत आहे. यामुळे हे दगड कापून लोकांनी आपल्या सोयीनुसार रुम, हॉल, किचन बनवले आहे. 
- या कुटुंबांसह त्यांचे पाळीव प्राणीही या दगडांच्या छताखाली राहत आहे. 
- येथील लोकांचा आहार साधा आहे. यांना मलेरिया होणे सहज बाब आहे.
 
गुहा ढासळू लागल्या, त्यामुळे लोकांचे शहराकडे मार्गक्रमण-
 
- दुस-या जागतिक युध्‍दानंतर येथे राहणारे लोक आधुनिक मटेरा शहरात जाऊन राहून गेले. कारण गुफा ढासळू लागले होते. 
- 1993 मध्‍ये यास युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केल्याने त्यास मोठा आधार मिळाला आहे. 
- असंख्‍या गुहांचे पुन्हा नव्याने उभारणी करण्‍यात आली आहे. ती राहण्‍याजोगी बनवली आहेत. 
- यात घर, हॉटेल आणि रेस्तरॉंही पर्यटकांना आकर्षित करीत आहे. 
- 2004 मध्‍ये एका टीव्ही शो पॅशन ऑफ द ख्रिस्टमध्‍ये हे गुहा दाखवली गेली आणि बायबलवर आधारित अनेक चित्रपटही चित्रित करण्‍यात आली.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, जगातील सर्वात जुन्या दगडांच्या गावाची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...