आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आेबामांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या अखेरच्या भाषणासाठी नडेलांना निमंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांचे काँग्रेसमध्ये मंगळवारी कारकीर्दीतील अखेरचे भाषण होणार आहे. या कार्यक्रमाला मायक्रोसॉफ्टचे सीईआे भारतीय वंशाचे सत्या नडेला यांना पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मिशेल आेबामांनी हे निमंत्रण पाठवले आहे.

अभिभाषणासाठी निमंत्रण देण्यात आलेल्या दोन डझन पाहुण्यांची यादी रविवारी व्हाइट हाऊसकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात ४८ वर्षीय नडेला यांचाही समावेश आहे. संगणक विज्ञानाला वर्गखोलीतून बाहेर काढून त्याचा झपाट्याने विस्तार करण्यामध्ये नडेला यांचे योगदान मानले जाते. त्यांनी संगणक क्षेत्रातील खासगी-सरकारी भागीदारीला अधिक प्रोत्साहन देण्याचे काम केले. सप्टेंबरमध्ये मायक्रोसॉफ्टने सुमारे साडेसात कोटी डॉलर्सची गुंतवणूक संगणक शिक्षणाच्या क्षेत्रात करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यात अभियंते आणि संगणकशास्त्राचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना चांगली संधी मिळणार आहे. सत्या यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये वेतन मर्यादा वाढवण्यात आली होती. दरम्यान, हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

बळींच्या स्मृतीमध्ये एक खुर्ची रिकामी
राष्ट्राध्यक्षांचे भाषण ऐकण्यासाठी येणऱ्या पाहुण्यांची आसनव्यवस्था युनियन गेस्ट बॉक्समध्ये केली जाईल. तेथे एक खुर्ची रिकामी ठेवलेली असेल. देशात सातत्याने होत असलेल्या गोळीबारातील मृतांच्या स्मृतीमध्ये ही खुर्ची ठेवली जाणार आहे. त्यांच्या स्मृतींचा आदर आणि त्यांची कथा सर्वांसमक्ष यावी म्हणून ही खुर्ची रिकामी ठेवली जाणार आहे.

नावीद शाह यांनाही आवतण

पाकिस्तानी वंशाचे लष्करी अधिकारी नावीद शाह यांनाही मिशेल यांनी भाषणाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. नावीद यांचा जन्म पाकिस्तानचा असला तरी त्यांची वाढ अमेरिकेत झाली आहे. त्यामुळे त्यांना मूळ देश परका तर अमेरिका आपले घर वाटते. अमेरिकी लष्कराकडून इराकमधील मोहिमेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. गेल्या चार वर्षांपासून ते अमेरिकेच्या लष्करात सेवा बजावत आहेत, अशा शब्दांत व्हाइट हाऊसने नावीद यांचा गौरव केला. अमेरिकेने भारताबरोबर पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीला समान वागणूक दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...