सना- सौदी अरबच्या लढाऊ विमानांनी येमेनमधील इब्ब प्रांतातील एका मिलिट्री बेसला टार्गेट केले. सौदी अरबने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात तीन निरागस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. हल्ला झाला तेव्हा विद्यार्थी मधल्या सुटीत वर्गाबाहेर निघत होते.
मैतममधील अल बस्तैन स्कूलजवळ हा हल्ला झाल्याचे इब्ब प्रांताचे शिक्षण मंत्रालय आणि राज्यपाल कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्यपाल कार्यालयाच्या सुत्रांनुसार, सौदी अरबच्या फायटर जेट्सने अल-हमजा मिलिट्री बेसला
आपले टार्गेट केले. हल्ल्याच्या ठिकाणापासून मिलिट्री बेस अवघ्या 500 मीटर अंतररावर आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, येमेनमधील दोन आठवड्यांच्या संघर्षात जवळपास 80 मुलांचा मृत्यू झाला. सुमारे लाखाहून जास्त लोकांनी सुरक्षित स्थळी अाश्रय घेतला असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केली आहे.
येमेनमधील हिंसाचारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे संसर्गजन्य अाजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या औषधसाठ्यामुळे अनेक रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करणे कठीण झाले आहे. रुग्णालयांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात तीन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका रुग्णवाहिकेच्या चालकाचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हल्ल्याचे PHOTO...