आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Arabia Executes 47, Including Top Shiite Cleric

सौदीने शिया धर्मगुरूसह ४७ कैद्यांना दिला मृत्युदंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निम्र अल निम्र (फाइल फोटो) - Divya Marathi
निम्र अल निम्र (फाइल फोटो)
दुबई - २०११ च्या अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील दोषी शिया धर्मगुरूसह एकूण ४७ जणांना सौदी अरेबियाने मृत्युदंडाची शिक्षा दिल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. मृत्युदंडासाठी ४७ कैद्यांची यादी तयार करण्यात आली होती, अशी माहिती सौदीच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तात देण्यात आली होती.

शेख निम्र अल निम्र असे धर्मगुरूचे नाव आहे. गेल्या वर्षी सौदीने १५७ जणांना मृत्युदंड दिला होता. गेल्या दोन दशकांतील मृत्युदंडाची ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातील अल्पसंख्याक शिया समुदायामध्ये अन्याय होत असल्याची भावना आहे. ५६ वर्षीय निम्र यांनी अरब क्रांतीसाठी तरुणांना सरकारच्या विरोधात भडकवले होते, असा त्यांच्यावर ठपका होता. सरकारविरोधी कारवायांत दोषी आढळून आल्यांची यादी ऑक्टोबरमध्येच तयार करण्यात आली होती. त्यात निम्र यांच्या नावाचाही समावेश होता.

मोठी किंमत मोजावी लागेल
सुन्नी समुदायाची सत्ता असलेल्या सौदीत शिया समुदायावरील अन्याय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निम्र यांना मृत्युदंड देण्याची मोठी किंमत सौदीला चुकवावी लागेल, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. सौदी सरकार सातत्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देत आले आहे. त्यांना दहशतवादी आपले वाटतात. परंतु देशातील समीक्षक किंवा विरोधक नकोत. त्यांचे हे धोरण कायम चालू शकणार नाही, त्याची मोठी किंमत त्यांना मोजावीच लागेल, असे शियाबहुल इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होस्न अन्सारी यांनी म्हटले.
निम्र अल निम्र (फाइल फोटो)