आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरबमध्ये शिया धर्मगुरूंसह 47 जणांना एकाच दिवशी शीरच्छेदाची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
रियाद - सौदी अरबमध्ये ज्या लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे, त्यामध्ये महत्त्वाचे शिया धर्मगुरू शेख निम्र अल निम्र यांचाही समावेश आहे. मारलेल्या सर्वांना दहशतवादाशी संबंध असल्याचा आरोप होता. शनिवारी होम मिनिस्ट्रीने ही माहिती दिली. दरम्यान, निम्र यांच्या हत्येमुळे इराणमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

धर्मगुरुंना शिक्षा दिल्याने इशारा...
- रॉयटर्स या न्यूज एजंसीच्या मते, सौदीला याची किंमत चुकवावी लागेल असे इराणने स्पष्ट केले आहे.
- ईराणच्याच एका मौलवींनी भविष्यवाणी केली आहे की, निम्र यांच्या हत्येनंतर सौदीचे पतन होणार आहे.

कोण होते शेख निम्र...
- पूर्व सौदी अरबमध्ये 2011 मध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनाचे मुख्य नेते निम्र होते.
- या परिसरांमध्ये शियांनी त्यांच्यावर अनेक वर्षांपासून अन्याय होत असल्याचे म्हटले होते.
- शेख निम्र यांना ऑक्टोबर 2014 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अल कायदाशी नाते...
- रिपोर्टनुसार मृत्यूदंड देण्यात आलेल्यांपैकी अनेकांवर 2003-06 दरम्यान अल कायदाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता.

1995 मध्ये सर्वाधिक शिरच्छेद...
- एखा रिपोर्टनुसार सौदीने 2016 च्या सुरुवातीलाच 47 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.
- 1995 नंतर सर्वात मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेली ही शिक्षा समजली जात आहे. त्यावेळी 192 लोकांचे शीरच्छेद करण्यात आले होते.
- 2015 मध्ये किमान 157 आणि 2014 मध्ये 90 जणांचे शीरच्छेद करण्यात आले.