आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीमध्ये एका प्रिन्सला मृत्यूदंडाची शिक्षा, 40 वर्षानंतर राज परिवारातील सदस्याला अशी शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीरला मंगळवारी फाशी देण्यात आल्याचे सऊदी अरेबियाच्या मंत्र्याने सांगितले आहे. - Divya Marathi
कबीरला मंगळवारी फाशी देण्यात आल्याचे सऊदी अरेबियाच्या मंत्र्याने सांगितले आहे.
रियाध - सौदी अरेबियामध्ये मंगळवारी शाही परिवारातील एक प्रिन्स तुर्की बिन सऊदी अल-कबीर याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. एका मर्डर केसमध्ये कोर्टाने कबीरला दोषी ठरविण्यात आले होते. साधारण 40 वर्षानंतर 'हाऊस ऑफ सऊद' च्या एखाद्या सदस्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे. याआधी 1977 मध्ये प्रिन्सेस मिशाएल-बिन-फहद हिला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती.
2016 मध्ये अशी शिक्षा झालेले कबीर 134वे
- सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कबीर यांना ही शिक्षा मंगळवारी देण्यात आली. मृत्यू कसा दिला याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
- मंत्र्यांचा दावा आहे, की या शिक्षेमुळे देशातील नागरिकांमध्ये हा संदेश जाईल की सरकार न्याय आणि लोकांच्या सुरक्षेबाबत जागरुक आहे.
- कबीरवर आदेल-अल-मोहम्मद नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप होता. आदेल हा कबीरचा मित्र होता.
- मृत्यूदंडाची शिक्षा झालेला कबीर हा 2016 मधील 134वा व्यक्ती आहे.
बातम्या आणखी आहेत...