आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या राजधानीवर हल्ल्याचा कट उधळला, थेट येमेनहून बंडखोरांनी डागले होते स्कड मिसाइल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - येमेनमधून थेट सौदी अरेबियावर बॅलिस्टिक मिसाईल सोडण्यात आली. मात्र, सौदी अरेबियाने हा मिसाइल हल्ला उधळून लावला. येमेनमध्ये ज्या बंडखोरांवर सौदीचे हवाई हल्ले सुरू आहेत. त्याच बंडखोरांनी सौदीवर क्षेपणास्त्र सोडले होते. शिया बंडखोर समूह हौथीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हवेतच उद्ध्वस्त झालेल्या मिसाइलचा ढिगारा रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडला आहे. 

लोकांनी ऐकला जोरदार स्फोटाचा आवाज
> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकांनी शनिवारी जबरदस्त स्फोटाचा आवाज ऐकला. मात्र, या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 
> सौदी अरेबियाच्या प्रवक्ते तुर्की अल-मालिकी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीप्रमाणे, विमानतळावर शनिवारी संध्याकाळी येमेनहून थेट मिसाइल हल्ला करण्यात आला होता. 
> "मिसाइलने रहिवाशी भागाला लक्ष्य करण्यात आले होते. हे क्षेपणास्त्र सौदी अरेबियाने पॅट्रियट मिसाइलविरोधी यंत्रणेने हवेतच उद्ध्वस्त केले. रियाध विमानतळावर या मिसाइलचा चुराळा पडला आहे. ज्या ठिकाणी क्षेपणास्त्राचे तुकडे पडले, तेथे कुणीही नव्हते. त्यामुळे, जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 
> अल-मसीरा वृत्तवाहिनीच्या माहितीप्रमाणे, मिसाइल रियाधवर तब्बल 1200 किमी दूर येमेनमधून डागण्यात आले होते. 
> या हल्ल्यानंतर हवाई वाहतुकीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. सर्व काही नियंत्रणात आणि सुरळीत सुरू आहे असे सौदी अरेबियाच्या विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले.
 
पुढील स्लाइड्सवर रात्री हवेत उद्ध्वस्त झालेले क्षेपणास्त्र आणि ढिगाराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...