आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरबमध्ये ईद आज, टॉवर्सवरून टिपले काबा शरीफचे सुंदर PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरबमध्ये आज ईद साजरी केली जात आहे. सौदी सरकारने या निमित्ताने 12 दिवसांची सुटी जाहीर केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्याचा अखेरच्या दिवशी मक्का येथील ग्रँड मशिदीत जगभरातून आलेल्या मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. हा नजारा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्समध्ये झुंबड उडाली होती. अनेक फोटोग्राफर्सनी मक्का रॉयल हॉटेल टॉवरच्या वरून काबा शरीफचे एरियल फोटो क्लिक केले. याला अबराज अल-बैत टॉवर्सही म्हटले जाते.

ग्रँड मशिदीजवळ हे टॉवर आहे. विशेष म्हणजे मक्का इस्लाममधील सर्वात पवित्र जागा समजली जाते. एका आकडेवारीनुसार सुमारे 20 लाख लोक याठिकाणी आले होते. ही मशीद अल-हरम नावानेही ओळखली जाते. इस्लाममध्ये प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने एकदा हजची यात्रा करावी असे कुराणमध्ये सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काबा शरीफचे एरियल PHOTO...
बातम्या आणखी आहेत...