आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिश्रीमंत सौदी अरेबियातही आहेत गरीब लोक, पाहा यांची लाईफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदीच्या रियाधमधील या झोपडपट्टीचे छायाचित्र छायाचित्रकार लिन्से एडेरियोने कॅमे-यात कैद केले आहे. - Divya Marathi
सौदीच्या रियाधमधील या झोपडपट्टीचे छायाचित्र छायाचित्रकार लिन्से एडेरियोने कॅमे-यात कैद केले आहे.
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाची गणना जगातील श्रीमंत देशांमध्‍ये होते. हे अतिश्रीमंत लोकांचे सर्वात मोठे ठिकाण आहे. यांची संख्‍यो अधिक असतानाही देशातील 20 टक्के जनता खूप गरिबीत आयुष्‍य जगत आहे. मात्र येथील गरिबी जगासमोर अपवादानेच येते. लंडनचा छायाचित्रकार लिन्से एडेरियोने येथील झोपडपट्ट्यांचे छायाचित्र कॅमे-यात कैद केले आहे. गरिबीला लपवत होते देशाची सरकार...
- रियाधमध्‍ये लक्झरी शॉपिंग मॉल्ससोबतच राजधानीतील झोपडपट्ट्यांच्या रांग सहज नजरेत पडेल.
- गरिबी आणि विकासावर लेखन करणारे सौदी अभ्‍यासक रोसी बशीर म्हणतात, देश येथील गरिबी लपवतो.
- ते सांगतात, येथे लोक भूकेमुळे तडफडत आहेत आणि श्रीमतांकडून गरिबांचे हाल पाहावत नाही.
- सौदी सरकार आपल्या देशातील गरिबांची आकडेवारी अधिकृतरित्या कमीच दाखवत असते.
- दुसरीकडे माध्‍यमांमधील वृत्त आणि खासगी संस्थांच्या अहवालानुसार, 20 ते 40 लाख लोकसंख्‍या प्रत्येक महिन्याला 520 डॉलरपेक्षा कमी उत्पन्नात आयुष्‍य जगतात.
- सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात गरिबी वाढण्‍यामागे सर्वात मोठे कारण बेरोजगार तरुणांची वाढती संख्‍या आहे.
जेव्हा सरकारी प्रसारमाध्‍यमाने दाखवली गरिबी
- द गार्डियन वृत्तपत्रानुसार, सौदी 2002 पर्यंत सरकारी प्रसारमाध्‍यमांसाठी गरिबी दाखवण्‍यापासून टाळाटाळ करत होते.
- राजा अब्दुल्लाने जेव्हा देशाची सत्तासूत्रे आपल्या हातात घेतल्यावर त्यांनी रियाधच्या झोपडपट्ट्यांचा दौरा केला होता.
- तेव्हा बातम्यांमध्‍ये सौदीच्या अनेक लोकांनी देशातील गरिबी पहिल्यांदा पाहिली होती.
- यानंतर प्रिन्स सुलतान बिन सलमानने देशात गरिबीची समस्या असल्याचे मान्य करुन ती निर्मुलनासाठी काम करण्‍याचे मान्य केले.
- त्यांनी तीन ते पाच वर्षांच्या आता आर्थिक विकासाच्या माध्‍यमातून गरिबी दूर करण्‍याचे सांगितले होते.
- सरकारकडून अब्जावधी डॉलर प्रत्येक वर्षी लोकांच्या शिक्षण आणि आरोग्यसुविधेवर खर्च केले जात आहे.
- या व्यतिरि‍क्त प्रत्येक महिन्याला निवृत्तवेतनासोबत अन्न आणि वीज बील भरले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...