आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूतावासावर हल्ला केल्याने सौदी-इराण तणावात वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान / रियाध- इराण आणि सौदी अरबदरम्यान गुरुवारी तणाव अधिक वाढला. येमेनची राजधानी सनामध्ये सौदी अरबच्या विमानांनी जाणीवपूर्वक इराणच्या दूतावासावर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप इराणने केला. यात अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी तपास करण्याचे आश्वासन सौदी अरबने दिले आहे.

रियाधमध्ये सौदी गठबंधनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अहमद असेरी यांनी सांगितले, ‘आमच्या सैन्याने बुधवारी रात्री सनामध्ये भीषण हवाई हल्ले केले. हल्ले बंडखोरांच्या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी केले. आंदोलकांनी रिकाम्या असलेल्या इराण दूतावासात आश्रय घेतला होता.’ एपीच्या सूत्रांनुसार दूतावासाची इमारत सहीसलामत आहे. येमेनमध्ये हाउती बंडखोरांच्या विरुद्ध सौदीचे हल्ले सुरू आहेत. सरकारविरोधी बंडखोरांना इराणचे समर्थन आहे.