आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंसाचार : सौदीत आयएसचा हल्ला; २१ शिया ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने येथील एका मशिदीवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात २१ जण ठार, तर ८१ जण जखमी झाले. शिया मशिदीवर हा हल्ला करण्यात आला. पूर्वेकडील प्रांतात ही घटना शुक्रवारी घडली.

कातिफ प्रांतातील कुदेह येथील मशिदीमध्ये शुक्रवारी साप्ताहिक प्रार्थनेच्या वेळी हल्लेखाेरांनी हा हल्ला केला. सुन्नी कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सुरक्षा रक्षकांना वाटते.
नोव्हेंबरमध्येदेखील शिया समुदायाला लक्ष्य करण्यात आले होते. आत्मघाती हल्लेखोराने स्वत:भाेवती स्फोटके बांधलेली होती. हल्ल्यातील १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यामागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सौदीतील हल्ल्याची जबाबदारी घेण्याची ही आयएसची पहिलीच वेळ आहे. मशीद परिसरात रक्ताचे पाट वाहत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. आयएसने रक्तरंजित शुक्रवार केल्याने या भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शिक्षेची मागणी
सुन्नी कट्टरवाद्यांनी आयएसच्या मदतीने केलेला हा नृशंस हल्ला असून दोषींना तत्काळ शिक्षा करण्याची मागणी शिया समुदायाकडून करण्यात आली आहे. हिज्बुल्ला यांनाही याबद्दल दोषी धरले पाहिजे. बाॅम्बहल्ल्यास सौदीचे प्रशासनही जबाबदार असल्याचा संतापही शिया समुदायाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

‘हेट स्पीच’ सुरूच
सोशल मीडियात शिया समुदायाच्या विरोधात अतिशय चुकीच्या पद्धतीने मतप्रदर्शन केले जाते. त्यातून शिया समुदायाबद्दल घृणास्पद भावना पसरवण्यात येते. सुन्नी सरकार या समुदायाकडून त्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेकडून निषेध
सौदीतील हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जॉश अर्नेस्ट यांनी घटनेचा धिक्कार केला.
बातम्या आणखी आहेत...