आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Engineer Allegedly Beat Up Indian Worker In Mecca

VIDEO: मक्केत काम करणाऱ्या भारतीय कामगाराला असे बेदम मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्का- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दावा करण्यात आला, की यातील पांढऱ्या कपड्यातील सौदी इंजिनिअर मक्का एक्स्टेंशनवर काम करीत असलेल्या भारतीय कामगाराला बेदम मारत आहे. सुरवातीला हा व्हिडिओ तारिक फतह नावाच्या एका कॅनडाच्या पत्रकाराने फेसबुकवर शेअर केला होता. त्यानंतर सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर तो व्हायरल झाला. आतापर्यंत हजारो युजर्सनी हा व्हिडिओ बघितला आहे.
काय आहे व्हिडिओत
यात पांढऱ्या कपड्यांमध्ये एक सौदी इंजिनिअर दिसतो. तो नारंगी कपड्यांमध्ये असलेल्या भारतीय कामगाराला बेदम मारत आहे. कामगार वारंवार माफी मागत आहे. मात्र त्याचा मारहाण करणाऱ्या अभियंत्यावर काही परिणाम होत नाही. सुरवातीला तो कानाखाली मारतो. परंतु, नंतर हातात पट्टा घेऊन बेदम मार देतो. हा कामगार पेहरावावरुन मुस्लिम समाजाचा वाटतो.
हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करताना तारिक फतह यांनी लिहिले आहे, की सौदीच्या लोकांनी एक भारतीयाला मारुन मारुन अर्धमेले केले आहे. दुसरीकडे सौदी डिप्लोमॅट्स भारतीय आणि नेपाळी महिलांचे रेप करीत आहेत. खरंच या घटनेचे आपल्याला आश्चर्य वाटायला हवे...
सौदीत चर्चेला उधाण
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सौदी अरबमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अब्दुल्ला अजीज अल मुशैती नावाच्या वकीलाने इंजिनिअरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी मशैती यांनी सौदी सरकारशी संपर्क साधला आहे. भारतीय कामगाराला मिळालेली वागणूक अमानविय आहे. दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करायला हवी. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या सौदी नागरिकांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुढील स्लाईडवर फोटोंमध्ये बघा, या भारतीय कामगाराला सौदी इंजिनिअरने कसे अमानुषपणे मारले...