आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर अपघातात सौदीचे राजपुत्र ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- सौदीतील उच्चपदस्थ राजपुत्र आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यात राजपुत्र ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. दक्षिण सौदीमध्ये हा अपघात झाला असून हेलिकॉप्टरमधील सर्व ८ व्यक्ती यात ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सौदीच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, रविवारी हा अपघात झाला. सौदी अरबच्या असीर प्रांतात हे हेलिकॉप्टर कोसळले. येथील आभा येथील प्रकल्प पाहणीसाठी राजपुत्र आणि अधिकारी जात होते. येमेनच्या सीमेपासून हे शहर १६० किलोमीटर अंतरावर आहे.  

येमेनमधील हाऊती बंडखोरांविरुद्ध सौदी आणि त्याचे मित्रराष्ट्र मार्च २०१५ पासून लढा देत आहेत. अद्याप हेलिकॉप्टर अपघाताचे कारण समजू शकले नाही. हेलिकॉप्टरच्या अवशेषांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, येमेनमधील हाऊती अधिकाऱ्यांनीदेखील यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. स्थानिक वाहिनीनेदेखील केवळ अपघात झाल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. 
 
असीर प्रांताचे उपराज्यपाल : सौदीतील अधिकृत वृत्तवाहिनी अल अरेबियाने म्हटले आहे की, असीर प्रांताचे उपराज्यपाल आणि राजपुत्र  मन्सूर बिन मुकरीन आणि ७ सहकारी हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले आहेत. राजपुत्र मुकरीन बिन अब्दुलाझीझ यांचे मन्सूर पुत्र होत.
 
अब्लुलाझीझ हे गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख राहिले आहेत. किंग सलमान यांनी त्यांना पूर्वी मुख्य पदावरून हटवले होते. त्यामुळे शाही घराण्यातील वादातून हा मृत्यू झाला का, असेही गूढ आहे. मुहंमद बिन सलमान या विद्यमान युवराजांशी त्यांचे पूर्वी मतभेद चव्हाट्यावर आले होते. अद्याप या अपघाताविषयी विविध तर्कवितर्क आहेत. अपघाताचे कारण स्पष्ट होईपर्यंत स्थिती तणावपूर्ण राहील. 
बातम्या आणखी आहेत...