लंदन - सौदी अरबच्या एका अब्जाधीशाने लंडनच्या सर्वात व्यस्त रस्त्यावर त्याची लक्झरी पोर्शे कार स्वच्छ करून घेतली. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. ही कार सौदी अरबचा रॅली ड्रायव्हर याजीद अल-राझीची होती. त्याला ही कार घेऊन सुपरकार सेशनमध्ये जायचे होते. त्याने लंडनच्या सर्वात व्यस्त रोडपैकी एक असलेल्या ब्रॉम्पटन रोडवर या कारची स्वच्छता सुरू केली. ट्राफिक जाम होऊ लागल्याने बसला लेन बदलाव्या लागल्या. या कारची किंमत दहा कोटी असून एका सेकंदात ती ती 200 किमीचा वेग घेऊ शकते.
रस्त्यावरच क्लिनिंग-पॉलिशिंग
ही Porsche 918 Spyder कार नुकतीच सौदीतून ब्रिटनला आणण्यात आली होती. तिच्यावर धूळ आणि वाळूचे थर जमा झाले होते. पण ही कार गॅरेज किंवा दुकानात स्वच्छ करण्याऐवजी मालकाने रस्त्यावरच तिची स्वच्छता करून घेतली. त्यासाठी त्याने दोघांना कामाला लावले होते. त्यांनी सुमारे तासभर या कारची स्वच्छता केली. तोपर्यंत या रस्त्यावर कोंडी झालेली होती. कार रस्त्याच्या कडेला लावलेली होती तरी कारचे दरवाजे उघडल्यानंतर जाणाऱ्या गाड्यांना अडचण होत होती.
रॅलींची आवड
सौदीचा गर्भश्रीमंत अल-राझी याजीद याला महागड्या कारसह रॅलींमध्ये सहभागी होण्याचा छंद आहे. तो युरोप आणि आखाती देशातील अशा अनेक रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. त्याची स्वतःची रेसिंग टीम आहे. तिचे नाव 'याजीद रेसिंग' आहे. 2008 मध्ये सौदी अरब आणि गल्फमध्ये त्याने सर्वप्रथम 'गुडविल अॅम्बेसेडर' ची भूमिका निभावली होती. जुलै आणि ऑगस्टदरम्यान लंडनमध्ये सुपरकार सेशन होत असते, याठिकाणी अनेक अरबी त्यांच्या कार घेऊन येत असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO