आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ट्विटर\'वर विनाहिजाब फोटो शेअर करणे पडले महागात, मुस्लिम तरुणीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलाक-अल-शेहरी (20) - Divya Marathi
मलाक-अल-शेहरी (20)
रियाद- सौदी अरबमध्ये हिजाब परिधान न करता फोटो 'ट्विटर'वर पोस्ट करणे एका मुस्लिम तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. सौदी अरबमधील कायद्याच्या विरोधात जाऊन या तरुणीने फोटो तिच्या 'ट्विटर'वर अकाउंटवर शेअ‍र केले होते.
दरम्यान, सौदीअरबमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी विना हिजाब फोटो काढण्यास बंदी आहे.
कोण आहे ही महिला?
- रियादमधील पोलिस अधिकारी फवाज अल-मैमन यांनी सांगितले की, मलाक-अल-शेहरी (20) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
- तिने स्वत:चे विना हिजाब फोटो 'ट्विटर'वर अकाउंटवर शेअ‍र करून सौदी अरबमधील कायद्याचे उल्लंघन केले आहे.
-पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. रियाद शहरातील लोकप्रिय रियाद कॅफेसमोर उभी राहून तिने हा फोटो घेतला होता. तिने यावेळी हिजाब परिधान केला नव्हता.
- त्याचप्रमाणे, मलाक हिच्यावर गैर-पुरुषासोबत खुलेआम बोलण्याचाही आरोप आहे. सौदी अरबमध्ये महिलांना या गोष्‍टी करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... रियादमध्येे महिलांना स्वातंत्र्य नाही...
बातम्या आणखी आहेत...