आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Prince Alwaleed Will Donate Entire 32 Billion Fortune To Charity

दोन लाख कोटींची संपत्ती दान करणार सौदीचे प्रिन्स तलाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या शाही विमानात बसलेले प्रिन्स अल वलीद बिन तलाल - Divya Marathi
आपल्या शाही विमानात बसलेले प्रिन्स अल वलीद बिन तलाल
रियाध- सौदी अरेबियाचे राजकुमार अल-वलीद बिन- तलाल यांनी आपली सर्व संपत्ती समाजकार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 32 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 2.04 लाख कोटी रुपये आहे.

आगामी वर्षात दान करावयाची रक्कम संपूर्ण योजनेसह जारी करण्यात येईल. सांस्कृतिक समज वाढवणे, सामाजिक विकास, युवा कल्याण, महिला सक्षमीकरण आणि नैसर्गिक संकटाच्या वेळी मदत म्हणून या रकमेचा वापर केला जाईल. ही रक्कम कधी खर्च करायची याची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. या रकमेचा वापर ठरवणाऱ्या विश्वस्त संस्थेच्या संचालक मंडळाचे आपण स्वत: अध्यक्ष राहणार आहोत, असे बिन-तलाल म्हणाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, प्रिंसची शाही लाइफ स्टाइल...