आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत आजोबासोबत \'सेल्फी\' काढून युवकाने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- लग्न.. वाढदिवस.. पार्टी.. निरोप समारंभ.. असे अथवा कॉलेजच्या कट्ट्यावरून निघालेले सेल्फीचेभूत आता थेट मढ्यांच्या डोक्यावर बसू लागले आहे. एका युवकाने आपल्या मृत आजोबांच्या बाजुला उभे राहून जीभ बाहेर काढत सेल्फी घेतला. इतकेच नव्हे तर तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'अलविदा दादा', असे कॅप्शनही त्याने फोटोला दिले आहे.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, सौदी अरबमध्ये ही घटना घडली आहे. एका युवकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या मृत आजोबांसोबत दिसत आहेत. युवकाचे आजोबा बेडवर मृतावस्थेत पडले असून या युवकाने त्यांच्यासोबत जीभ बाहेर काढून सेल्फी काढला आहे. त्यावर मात्र, या युवकाला तिखट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. युवकाच्या या असंवेदनशील व्यवहारावर बहुतांशी ने‍टिजन्सनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.
मृत आजोबासोबत सेल्फी काढून फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, या युवकाला आता चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. सौदी अरब प्रशासनाला याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर याबद्दल चौकशीही सुरू करण्‍यात आली आहे. रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी या युवकाला असा सेल्फी काढण्याची परवानगी दिलीच कशी? असा प्रशासनाने उपस्थित केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मृत आजोबासोबत 'सेल्फी' काढून युवकाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो