न्यूयॉर्क - सौदी अरेबियाने अमेरिका आणि अमेरिकी खासदारांना धमकी दिली आहे. ९/११ च्या हल्ल्यात कोणत्याही पद्धतीने दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी अमेरिकेला बजावले आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकन संसदेने अमेरिकेत अस्तित्वात असलेली अरबांची संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न केल्यास ते त्याआधीच संपत्ती विकतील. ही मालमत्ता ७५० अब्ज डॉलर आहे. धमकीनंतर ओबामा प्रशासन अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, अमेरिकी संसद ९/११ च्या हल्ल्यासंदर्भात एक विधेयक मंजूर करू इच्छित आहे. यामध्ये सौदी अरेबियास त्यासाठी दोषी ठरवणे अपेक्षित आहे. अमेरिकेने आपल्या देशाची संपत्ती जप्त करू नये, असे सौदी अरेबियाला वाटते. सौदी अरेबियाच्या धमकीनंतर ओबामा प्रशासनाने सौदी अधिकारी तसेच अमेरिकी खासदारांशी या मुद्द्यावर चर्चा केली. अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत मालमत्ता विक्री करणे सौदी अरेबियासाठी सोपे असणार नाही. कारण यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान होऊ शकते. मात्र, मालमत्ता जप्तीतून त्यांना विक्रीपेक्षा जास्त फायदा मिळू शकेल.
ओबामा प्रशासनाचा खासदारांना इशारा : ओबामा प्रशासन, पेंटागॉन तसेच परराष्ट्र विभागाने खासदारांना इशारा दिला आहे. विधेयक मंजूर झाल्यास केवळ सौदी अरेबियाशी संबंध बिघडणार नाहीत, तर आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अब्देल अल जुबेर यांनी गेल्या महिन्यात अमेरिका दौऱ्यात आपल्या देशाच्या वतीने अमेरिकी नेत्यांना धमकीची माहिती दिली हाेती.