आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना पूर्ण नागरिकत्व द्या, हजारो साैदींकडून मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - महिलांच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सौदी अरेबियाच्या हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महिलांचे काम, अभ्यास, विवाह, प्रवास यांवर नातलग वा पुरुषांचा अंकुश असण्याची पद्धत संपवण्याविषयी ही याचिका आहे. स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांचा वावर असावा, अशी मागणी राजसत्तेकडे करण्यात आली आहे. सुजाण वयातील महिला पूर्णपणे निर्णयक्षम आणि स्वतंत्र असावी, अशी मागणी यात करण्यात आल्याचे महिला हक्क कार्यकर्त्या एजाजा अल युसूफ यांनी सांगितले. युसूफ या निवृत्त प्रोफेसर आहेत. शाही न्यायालयात ही याचिका दाखल करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. यावर १४, ७०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. एजाजा आता ही याचिका मेलद्वारे पाठवणार आहेत. सौदी अरेबियामध्ये महिलांवर प्रचंड नियंत्रणे आहेत. त्यांना वाहन चालवण्याचीही परवानगी देशात नाही. पिता, पती किंवा भाऊ यांच्या पूर्वपरवानगीशिवाय महिला अभ्यास, प्रवास इतर उपक्रमांत सहभागी होऊ शकत नाहीत. महिला कैद्यांना त्यांचा पुरुष पालक घेण्यास आल्याशिवाय मुक्तता मिळत नाही. शिक्षेचा अवधी संपल्यानंतर जर पुरुष सदस्य घेण्यास आला नाही तर त्यांना तुरुंगातच राहावे लागते.
बातम्या आणखी आहेत...