आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत महिलांना घराबाहेर पडण्यासाठी आता पुरुषांची परवानगी लागणार नाही, किंग सलमान यांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत सर्वात वाईट रेकॉर्ड असलेल्या सौदी अरबच्या महिलांना आता रुग्णालय आणि कामावर एकट्या घराबाहेर पडता येणार आहे. सौदी अरबचे किंग सलमान यांनी महिलांच्या अधिकारासाठी एका आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, या पुढे सौदीत महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी, पोलिसांत तक्रार करण्यासाठी किंवा घराबाहेर पडण्यासाठी पुरुष साथीदार ठेवण्याची गरज राहणार नाही.
 
किंग सलमान यांचा नवा आदेश
सौदी अरबच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किंग सलमान यांनी नुकतेच एका आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, महिलांना शिक्षण, सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा आणि नोकरीवर जाण्यासाठी पुरुषांच्या परवानगीची गरज राहणार नाही. त्या स्वतःच्या मर्जीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यास आणि कोर्टात आपली बाजू मांडण्यास जाऊ शकतील. आपल्या पुरुष पालकाची परवानगी न घेता त्या आवश्यक कामांसाठी प्रवास सुद्धा करू शकणार आहेत. 
 
पुरुषांची परवानगी आवश्यक होती
सद्यस्थितीला सौदीत महिलांना घराबाहेर पडण्यासाठी आपल्या घरातील ज्येष्ठ पुरुष किंवा पालकाची लेखी स्वरुपात परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी देणारा पुरुष संबंधित महिलेचा पिता/पती/सख्खा भाऊ असणे आवश्यक आहे. तसेच काही खरेदी करण्यासाठी, मॉल व इतर बाजारांमध्ये फिरण्यासाठी सोबत पिता/पती/सख्खा भाऊ किंवा आपला वयस्क मुलगा सोबत घेऊन जाण्याचे बंधन आहे. किंग सलमान यांच्या आदेशानंतर ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा केली जात आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...