आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियाच्या राजमहालावर हल्ल्याचा कट उधळला, हल्लेखोरासह 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाचे राजा किंग सलमान यांच्या जेद्दाह येथील महालावर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला. येथील सुरक्षा रक्षकांनी तो उधळून लावला आहे. सौदी अरेबियाच्या स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिल्याची माहिती कतारचे माध्यम अल-जझीराने दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, किंग सलमान सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. तरीही, राजमहालाच्या परिसरात चोख सुरक्षा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे. अमेरिकेने सुद्धा जेद्दाह येथील दूतावास अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 
 
 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथील अल-सलाम पॅलेसवर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याला वेळीच रोखून ठार मारण्यात आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वच महत्वाच्या ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने अद्याप यावर अधिकृत माहिती जाहीर केली नाही.
बातम्या आणखी आहेत...