आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीच्या आजारातून माझ्या मुलीला वाचवा, ब्रिटिश महिलेची फेसबुकवर पोस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लँकशायर (इंग्लंड) - लँकशायरची ३४ वर्षीय वेकी वॉरथनची वेगळीच समस्या आहे. तिची मुली कॅटलिन (१३) ‘सेल्फी’च्या इतकी आहारी गेली आहे की तिला हा रोगच जडला आहे. रोज ती शंभरावर सेल्फी काढते. नंतर फेसबुकवर शेअर करते. एवढेच नव्हे, सडपातळ व सुंदर दिसावे म्हणून ती दिवसभर उपाशी राहते.

सौंदर्याचे एवढे वेड की तासन््तास ती आयब्रो सेट करत असते. विविध मॉडेल्सची छायाचित्रे पाहत बसते. अनेकदा मेकअपच्या नादात ती शाळेत जायचेच विसरून जाते. वेकी तिची समजून काढून कंटाळली आहे. शेवटी तिने एका मनोविकारतज्ज्ञाला दाखवले. तरी काही फरक पडला नाही. शेवटी वेकीने आता फेसबुकलाच पत्र पाठवले आहे. फेसबुकवर मुलीचा फोटो टाकून एक पोस्टही लिहिली आहे. तिला आता आशा आहे की, लोकच कॅटलिनची समजूत काढतील. तिला सांगतील की, ती मेकअपविनाच खूप सुंदर दिसते.

सेल्फीत खूप सुंदर दिसावे म्हणून माझ्या मुलीस वेड लागले आहे. तिच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. कुटुंबही खूप त्रस्त आहे. माझे कॅटलिनवर खूप प्रेम आहे. खरे तर ती मेकअपविनाच सुंदर दिसते हे मलाही पटते. तिची सुंदर दिसण्यासाठी चालणारी धडपड पाहून मला वाईट वाटते. सडपातळ दिसावी म्हणून ती अक्षरश: कित्येक दिवस जेवतच नाही. शाळेतही डबा खात नाही. सतत विचारत असते, ‘मी फार जाड दिसत आहे का?’ माध्यमेही अनेकदा तरुणींना सुंदर मुलींची छायाचित्रे दाखवून हा सेल्फीचा रोग जडवतात. बहुतांश मुलींना मॉडेल्सचे फोटो पाहून त्यांच्यासारखेच आपण दिसावे असे वाटते. कॅटलिन पण फेसबुकवर अशी छायाचित्रे तासन् तास पाहत बसते. मग आपणही तसेच दिसावे म्हणून मेकअप करते. शाळेत जाण्याची वेळ झाली तरी कॅटलिन सेल्फी घेण्यात गुंग असते. एवढे तरी बरे की शाळेच्या दप्तरात मेकअपचे साहित्य घेऊन जाण्याची परवानगी नाही. अकरा वर्षांची असताना कॅटलिनला ही सवय जडली. तेव्हा शाळेतील मुलींनी प्रथमच फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. हा प्रश्न आता केवळ कॅटलिनपुरता मर्यादित नाही. जगात अशा अनेक माता असतील ज्या माझ्यासारख्याच त्रस्त असतील.