आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'व्हॅलेंटाइन डे\'निमित्त प्रेम घोटाळेबाजांचा सुळसुळाट, 45 वर्षांवरील व्यक्ती सर्वाधिक फसतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सध्या जगभरात व्हॅलेंटाइन डेनिमित्त विविध कार्यक्रम, भेटवस्तू आणि भेटकार्ड खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सेंट व्हॅलेंटाइनच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या या  प्रेम  दिनानिमित्त ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये मात्र प्रेम घोटाळा होऊ नये यासाठी सजगतेचा इशारा देण्यात आला आहे. एकट्या राहणाऱ्या अनेक लोकांची ऑनलाइन  लूट केली जाते. भावनिकतेची लाट व्हॅलेंटाइननिमित्त निर्माण झालेली असते. त्याचाच गैरफायदा अनेक ऑनलाइन संकेतस्थळे घेतात. 
 
ऑस्ट्रेलियामध्ये तर इतर कोणत्याही घोटाळ्यांपेक्षा रोमान्स सॅकमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. यात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना प्रामुख्याने फसवले जाते. ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर कमिशनने (एसीसीसी) हे वास्तव आता समोर आणले आहे. एकट्या राहणाऱ्या व्यक्तींना जोडीदार मिळवून देण्याची प्रलोभने देऊन अज्ञात व्यक्तीकडे पैसा देण्यास सांगितले जाते.  

अशा ऑनलाइन लुटारूंकडून पोलिसांनी मोबाइल फोन, कॉम्प्युटर, ऑटोमॅटिक टेलर कार्ड जप्त  केले असून ते  येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत सादर करण्यात आले. या फसवणुकीला स्त्री-पुरुष समान प्रमाणात बळी पडतात. वर्ष २०१६ मध्ये सिंगापूरमधील ४३, मलेशियाच्या ६५ जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. मलेशियात अशा गुन्हेगारांच्या शोधासाठी खास मोहीम राबवण्यात येत आहे. मोबाइल मेसेजिंगद्वारे ते एकटेपण आलेल्या व्यक्तींना जाळ्यात आेढतात.  
 
प्रेमाचा ऑनलाइन शोध घेणारे फसतात
सध्या काही देशांमध्ये रोमान्स स्कॅमर्सचा सुळसुळाट झाला आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त ऑनलाइन प्रेमाचा शोध घेणाऱ्यांची संख्या वाढते. यांच्या भावनावेगाचा योग्य वेळी गैरफायदा घेणाऱ्यांचे रॅकेट  सक्रिय असते. एसीसीसीचे उपाध्यक्ष डेलिया रिकार्ड यांनी याविषयी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.  

यापासून राहा सावध 
फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा प्रोफाइल खूप विश्वसनीय दिसतो. काही व्यक्तींचे प्रोफाइल चोरून बनावट प्रोफाइल तयार केले जातात. त्यामुळे अनेक वापरकर्ते ऑनलाइन पेमेंट करतात. क्वालालंपूर, सिंगापूर  येथे असे बनावट प्रोफाइल तयार करणारे २७ जण सापडले. यात ११ नायजेरियन नागरिक आहेत. जोडीदाराचा शोध घेणाऱ्या आणि एकटेपणाला वैतागलेल्यांचा माग हे लोक काढतात व सापळा रचतात. शेजारील देशांमधील १०८ लोकांकडून त्यांनी ४.९ दशलक्ष डॉलर्स उकळल्याचे २०१६ मध्ये तपासात उघड झाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...