आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला चालकाने २० मुलांना जळत्या बसमधून काढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिंस जॉर्ज काउंटी - अमेरिकेतील बसचालक रेनिता स्मिथ दोन दिवसांपासून चर्चेत आहे. लोक तिला हिरो म्हणत आहेत. ती देखील सन्मानास पात्र आहे. रेनिता हिने जळत्या स्कूल बसमधून नर्सरीमध्ये शिकणाऱ्या २० लहान मुलांना सुखरुप बाहेर काढले. जळत्या बसच्या शेवटच्या आसनापर्यंत जाऊन तिने खात्री केली, एखादा मुलगा राहिला तर नाही. ही दुर्घटना मेरीलँडच्या प्रिंस जॉर्ज काउंटीमध्ये सोमवारी झाली. सायंकाळी ४.४५ वाजले असतील. रेनिता ग्लेनार्डन एलिमेंट्री शाळेच्या मुलांना घरी सोडायला निघाली होती. कॉलेज पार्कजवळ पोहोचल्यावर बसच्या मागील बाजूला आग लागली. पाहता पाहता बसला आगीने वेढा दिला. रेनिता हिने गांभीर्य आेळखून एकेक करुन २० मुलांना सुरक्षित बाहेर काढले. बस आगीमध्ये पूर्णपणे वेढली होती. तरीही ती खात्री करण्यासाठी गेली की एखादा मुलगा राहिला तर नाही. या ऐकू या साहसाची कहाणी रेनिता हिच्याच शब्दात....

मी तिसरा चौथा थांबा पार केला होता. तेवढ्यात डॅशबोर्डवर सूचना मिळाली आणि बसमध्ये धूर दिसू लागला. बसला तिथेच थांबवले. आणि विचार केला की दुसरी बस बोलावली पाहिजे. ज्यातून मुलांना त्यांच्या घरी पोहोचवता येईल. तेवढ्यात मागच्या आरशावर नजर गेली तर मागच्या बाजूने आगीचे लोळ उठताना दिसले. आग हळुहळु पुढच्या बाजूने सरकत होती. मी तत्काळ माईक ठेवला, सीट बेल्ट काढला आणि मुलांच्या मध्ये अक्षरश: उडी घेतली. एकेक करुन मुलांना बसच्या बाहेर काढणे सुरू केले. आग रौद्ररुप धारण करत होती. मी त्यावेळी एका आईचे कर्तव्य बजावत होती जी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करू शकते. त्यामुळेच मुलांना सुखरुप बाहेर काढू शकली. ज्यावेळी बसच्या मागील बाजूला पोहोचले तेव्हा फक्त धूर दिसत होता. बसचा भाग वितळत होता. मी पाहिले की एखादा लहानगा राहिला तर नाही. तेव्हा मला श्वास घ्यायला अडचण येत होती. ते तर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीच्या ज्वाळा नारंगी रंगाच्या होत्या. थोडी चूक झाली असती तर महागात पडले असते. मुलांचे पालक आणि शहरातील लोक मला हिरो ठरवताहेत. परंतु हे तर माझे कर्तव्य होते. मी पण दोन मुलांची आई आहे, आणि मुलांना सांभाळणे समजू शकते. मी मुलांना ज्यावेळी सोबत घेऊन जाते त्यावेळी देखील त्यांची आई असते. आणि जोवर मुले त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षित पोहचत नाहीत तोपर्यंत मुलांकडे लक्ष देणे माझी जबाबदारी आहे.
बातम्या आणखी आहेत...