आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientist Hawking Give Answer Of Yours Questions In Physics

शास्त्रज्ञ हॉकिंग भौतिकशास्त्रातील तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भौतिकशास्त्राविषयी काही शंका आहेत? मनातील प्रश्नांची उकल होत नाही? जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग रेडिट फोरमवर तुमच्या सर्व प्रश्नांना ऑनलाइन उत्तरे देणार आहेत. हॉकिंग हे रेडिटच्या एएमए (आस्क मी एनीथिंग) फोरमवर सहभागी होणार आहेत. या फोरमवर वापरकर्ते लोकांकडून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्न पोस्ट करतात. रेडिटचा एएमए फोरम ऑनलाइन असून लोक एखाद्या विषयावर प्रश्न विचारतात आणि लोक त्या प्रश्नांना शक्य तितक्या लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. परंतु हॉकिंग यांच्याबाबत तसे होणार नाही.
लोकांना आधी आपले प्रश्न पोस्ट करावे लागतील, त्या प्रश्नांना हॉकिंग पुढच्या आठवड्यात उत्तरे देतील. ज्यांना स्टीफन हॉकिंग यांना प्रश्न विचारायचे असतील ते ४ ऑगस्टपर्यंत रेडिटच्या एएमए फोरमवर आपले प्रश्न पोस्ट करू शकतील. पुढील काही आठवड्यांत हॉकिंग उत्तरे देतील.