आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भौतिकशास्त्राचा नोबेल; गुरुत्वीय लहरींचा शोध लावणारे तिघे ठरले पुरस्काराचे मानकरी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - गुरुत्वीय लहरी अर्थात ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावणाऱ्या संशोधकांना या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. रेइनर वेइसिस, बॅरी सी बॅरिश आणि किप एस थॉर्न या तिघांनी गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. गुरुत्वीय लहरींवर महान शास्त्रज्ञ अॅल्बर्ट आइंस्टाइन यांनी सिद्धांत मांडला होता. तोच सिद्धांत या तिघांनी शोध लावून साकारला आहे. या तिघांनी दोन वर्षांपूर्वी शोध लावताच जगभरात खळबळ उडाली होती.
 
 
गुरुत्वीय लहरींच्या माध्यमातून टाइम आणि स्पेसवर प्रभाव टाकला जाऊ शकतो असाही तर्क आहे. सध्या या लहरींचा केवळ शोध लागला आहे. त्यावरून काय-काय साध्य केले जाऊ शकते यावर अजुनही सविस्तर संशोधन झालेले नाही. तरीही टाइम ट्रॅव्हेलच्या संकल्पना मांडणाऱ्या भौतिकशास्त्र तज्ञांसाठी हे संशोधन खूप मोठी क्रांती मानली जाते. 
 
 
मॅसाच्युसेट्स माहिती तंत्रज्ञान विद्यापीठातील रेनर वेइस (85), आणि कॅलिफोर्निया माहिती तंत्रज्ञान विद्यापीठातील किप थॉर्न (77) यांनी लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्सर्विटी अर्थात LIGO ची संकल्पना 1984 मध्ये मांडली होती. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक बॅरी बॅरिश यांनी त्यानंतर दोघांना संशोधनात सहकार्य केले. दोन वर्षांपूर्वी गुरुत्वीय लहरींचा शोध या तिघांनीच लावला होता. 7 मार्च रोजी त्यांचा आणखी एक सहकारी रोनाल्ड ड्रेव्हर यांचे निधन झाले. नोबेल पुरस्कार मृत्यूनंतर दिला जात नाही. दरम्यान, रेनर वेइस, बॅरी सी बॅरिश आणि किप एस थॉर्न या तिघांना संयुक्तरीत्या भौतिकशास्त्रातील नोबेल आणि पुरस्काराची रक्कम वाटून दिली जाणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...