आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरमूडा ट्रँगलचे गुढ उकलल्याचा दावा, 100 वर्षात घेतले 1000 लोकांचे प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन: शास्त्रज्ञांनी जगासाठी अकलनिय अशा बरमुडा ट्रँगलचे गुढ उकलल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, असे षटकोणी ढगांमुळे होते. बरमुडा ट्रँगल अटलांटीक महासागरामध्ये ५ लाख स्क्वेअर किलोमिटरमध्ये पसरलेला एक भाग आहे. याचा आकार त्रिकोणी आहे. मागील १०० वर्षात या भागात ७५ विमान आणि १०० पेक्षा जास्त लहान मोठे जहाज बेपत्ता झाले असून यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.

ढगांमुळे वाढतो दाब...
- माध्यमांच्या अहवालानुसार, बरमुडा ट्रँगलवर संशोधन करत असलेल्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, बरमुडा ट्रँगलमध्ये खुप जड वस्तूंना स्वतःकडे ओढून घेण्याची शक्ती षटकोणी ढगांमुळे येते.
- कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मेट्रोलॉजिस्ट रँडी कॅरवेनी यांनी सांगितले की, हे ढग "एअर बॉम्ब" बनवतात. म्हणजेच हवेमध्ये बॉम्ब ब्लास्ट प्रमाणे शक्ती निर्माण करतात.
- रँडी कॅरवेनी या बरमुडा ट्रँगलवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमच्या सदस्या आहेत.
- या सोबतच १७० मैल (जवळपास २७३ किलोमिटर )/तास वेगाने ही हवा वाहते.
- हे ढग आणि हवा एकत्र येऊन विमान अथवा जहाजेला धडकते आणि त्यांना ओढत समुद्राच्या तळाशी घेऊन जाते.

त्सुनामीपेक्षा उंच लाटा तयार होतात...
- शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, बरमुडा ट्रँगलवर निर्माण होणारी शक्ती समुद्राच्या पाण्याला जेव्हा धडकते, तेव्हा त्सूनामीपेक्षा उंच लाटा तयार होतात. या लाटा एकमेकांना धडकून अजून जास्त शक्ती निर्माण करतात.
- या दरम्यान याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूला ते उध्द्वस्त करततात.
- शास्त्रज्ञांनी असाही दावा केला आहे की, हे ढग बरमुडा बेटाच्या दक्षिण भागात तयार होतात आणि मग 20 ते 55 मैलापर्यंत ते प्रवास करतात.

यापूर्वी एलियन असल्याचे सांगण्यात आले होते
- बरमूडा ट्रँगलच्या गुढावर जगात अनेक मान्यता आहेत. यामध्ये एक मान्यता अशीसुध्दा आहे की, या शक्तीमागे एलियनचा हात आहे.
- याच वर्षी मार्चमध्ये नॉर्वेमध्ये काही शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, बरमुडा ट्रँगल असलेल्या ठिकाणी समुद्रातून मिथेन गॅसची गळती होत आहे, ज्यामुळे तेथे विशेष गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होते.

कुठे आहे बरमुडा ट्रँगल
- हे जीवघेणे ठिकाण अटलांटीक महासागरात आहे. फ्लोरीडाच्या मियामी, बरमुडा बेट आणि प्योर्टो रिकोच्या सॅन जुआन दरम्यान आहे. या तीन्ही जागांना एकमेकांशी रेषांच्या साह्याने जोडल्यास एक त्रिकोण बनतो. यामुळे या ठिकाणाला बरमुडा ट्रँगल असे नाव मिळाले आहे.
- या संपूर्ण ठिकाणाचे क्षेत्रफळ जवळपास ५ लाख स्क्वेअर किलोमिटर एवढे आहे.
पुढील स्लाई़डवर पाहा, बरमुडा ट्रँगलचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...