जोहान्सबर्ग - दक्षिण अाफ्रिकेमध्ये मानवाच्या नव्या प्रजातीचा शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांच्या मते जोहान्सबर्गपासून सुमारे 50 किमी दूर 'रायझिंग स्टार' गुहांमध्ये गाडलेले 15 मानवी सांगाड्यांचे अर्धवट भाग आढळले आहेत. रिपोर्टनुसार त्यांची लांबी 5 फूट आणि वजन 45 किलोपेक्षा अधिक आहे.
नव्या प्रजातीचे नाव 'होमो नलेडी'
सायन्स मॅगझिन 'ईलाइफ' मध्ये पब्लिश स्टडी रिपोर्टवरून असे लक्षात येते की, या प्रजातीतील लोक धार्मिक कामेही करायचे. संशोधकांच्या मते या शोधामुळे पूर्वजांबद्दलचे आपले विचार बदलण्यास मदत होणार आहे. या नव्या प्रजातीला 'होमो नलेडी' नाव देण्यात आले आहे. स्थानिक भाषेत त्याचा अर्थ 'स्टार मॅन' असा होतो.
रिपोर्टनुसार, नलेडीचा मेंदूही फाल छोटा असतो. त्याचा आकार जवळपास एका संत्रीएवढा असावा. गुहेत खोदकाम करताना संशोधकांना 1,550 च्या आसपास अवशेष आढळले आहेत. हे नलेडी प्रजातीतील 15 नवजात बालके आणि पौढांच्या सांगाड्याचे भाग असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही प्रजाती पृथ्वीवर किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होती याबाबत संशोधकांना अद्याप माहिती मिळालेली नाही.
30 लाख वर्षे जुने मानव!
संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणारे प्रोफेसर ली बर्गर यांनी बीबीसीला सांगितले की, त्यांच्या मते नवी प्रजाती 'जिनियस होमो' म्हणजे आधुनिक मानवासारखी असू शकते. त्यांच्या अंदाजानुसार ही प्रजाती सुमारे 30 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये राहत असावी.
सेफ रूममध्ये ठेवले अवशेष
नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रोफेसर क्रिस स्ट्रींगर यांनी नलेडी यांचा हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आम्हाला मानवाच्या अधिकाधिक प्रजातींबाबत माहिती मिळत आहे. त्यावरून मानवाच्या विकासासाठी निसर्गाने नेहमीच प्रयोग केले असल्याचे समो येते. रिपोर्टनुसार नव्या प्रजातीचे अवशेष जोहान्सबर्गच्या विटवाटर्सरँड युनिव्हर्सिटीच्या एका सेफ रूममध्ये ठेवले आहेत. ही खोली एखाद्या बँकेच्या लॉकरएवढीच सुरक्षित आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS