आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5000 वर्षांपूर्वीचे शापित ताबूत उघडले, पिरॅमिडमध्ये सापडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅरो - जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि हजारो वर्षे प्राचीन अशा इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये आजही शेकडो रहस्य दडलेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून यावर संशोधन करणाऱ्या तज्ञांनी पिरॅमिडचे नवे चेंबर शोधून काढले आहे. 100 फूट लांब असलेल्या हे चेंबर ग्रॅन्ड गॅलरीवर आहे. हीच गॅलरी महाराणी नेफरटिटी आणि महाराजाच्या कक्षांना जोडते. या चेंबरचा खुलासा होताच संशोधकांनी नेफरटिटीची शापित ताबूत उघडल्याचे वृत्त पसरले. 
 
2 वर्षांच्या अध्ययनानंतर झाला खुलासा
संशोधकांच्या मते, बांधकामाच्या वेळी कॉरिडोर अपुरेच राहिले असा अंदाज आहे. संशोधकांचा समूह लवकरच या चेंबरमध्ये रोबोट पाठवण्याची तयारी करत आहे. या रोबोच्या माध्यमातून चेंबरचे आणखी काही रहस्य समोर येतील. जपान आणि फ्रान्सच्या संशोधकांना हा कॉरिडोर आणि चेंबर शोधून काढण्यासाठी सलग 2 वर्षे त्या ठिकाणाचा अभ्यास करावा लागला. चेंबरला संशोधकांनी चेंबरला स्कॅन पिरॅमिड बिग व्हाएड असे नाव दिले आहे. 

कॉस्मिक रे तंत्रज्ञानाचा वापर
संशोधकांनी हे चेंबर शोधून काढण्यासाठी कॉस्मिक रे इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यात कॉस्मिक किरण पिरॅमिडच्या आर-पार भेदण्यात आल्या. दगड ह्या किरणा शोषूण घेतात आणि रिकामी जागा किंवा हवा आढळताच ते दिसायला लागतात. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चेंबरचा उलगडा झाला आहे. कॅरो विद्यापीठासह अनेक देशातील तज्ञ मंडळी याचा अभ्यास करत आहेत. 

पुढील स्लाइड्वर पाहा, असे सापडले पिरॅमिडमध्ये नवीन चेंबर...
बातम्या आणखी आहेत...