आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एग फ्रीजिंगने महिलांची प्रजनन क्षमता जास्त काळ टिकेल?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवाच्या बीजांडाला आशेचा छोटा किरण समजले जाते. ते एक प्रतीक्षारत जग आणि मानवीय क्षमतेची नाजूक बाब आहे. आणि वेळ त्याचा शत्रू आहे. वयासोबत अंड्यांची प्रत आणि संख्या कमी होते. यासाठी गेल्या वीस वर्षांपासून डॉक्टर कँसर आणि अन्य आजारांनी पीडित लोकांचे एग फ्रीज करत आहेत. अशा रुग्णांची प्रजनन क्षमता कीमोथेरपी आणि अन्य कारणांमुळे नष्ट होऊ शकते. मात्र, २०१२मध्ये एग फ्रीजिंगचे नवे तंत्रज्ञान समोर आल्यानंतर अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनने या प्रक्रीयेवरील परीक्षणाचे लेबल काढले.

एग फ्रीजिंगचे नवे तंत्रज्ञान महिलांना निम्म्यापेक्षा जास्त वयात आई होण्यास मदतीची आशा निर्माण करते. तसे, अनेक अपेक्षांच्या समान हे सुध्दा काही कसोट्यांवर प्रमाणीत होऊ शकले नाही. अनेक महिला आपल्या फ्रोजन एगव्दारे मुलांना जन्म देतील, अनेक महिला तसे करू शकणार नाही. तंत्रज्ञानाच्या यशाचे आकडे उत्साह निर्माण नाही करत. इकडे, नुकतेच अॅपल, फेसबुकसह मोठ्या कंपन्यांनी एग फ्रीजिंगचा अवलंब केल्याने फर्टिलिटी इंडस्ट्री तेजीने वाढत आहे.

न्यूयॉर्कमधील फर्टिलिटी कंपनी एगबँक्सचे कार्यकारी अधिकारी जीना बरतासी आपल्या कंपनीला फर्टिलिटी इंडस्ट्रीला उबर (टॅक्सी सेवा)म्हणतात. त्यांचा अंदाज आहे, २०१८ पर्यंत दरवर्षी ७५ हजीर अमेरिकन महिला आपले एग फ्रीज करतील. गर्भनिरोधक गोळीनंतर एग फ्रिजींग महिलांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण शोध आहे.

असे होते एग फ्रीजिंग - बीजांड सुरक्षित ठेवण्यासाठी महिलांना या प्रक्रियेतून जावे लागते.

हार्मोन्स बिजांडांची संख्या वाढण्यासाठी महिलांना दोन आठवडे दररोज हारमोन्सचे इंजेक्शन घ्यावे लागत आहे.
खर्च- एक लाख ६०००० ते तीन लाख २०००० रुपये.

अंडे काढणे
डॉक्टर सुईव्दारे ५ से २५ बिजांड काढून अंडाशयात टाकतात.
खर्च- तीन लाख ८०००० ते सात लाख ६५००० रुपये.
फ्रीजिंग अंडे जलद फ्रीज करण्याची प्रक्रीया (विट्रीफिकेशन)मध्ये सुरक्षित ठेवून अनिश्चित कालावधीसाठी साठवतात.
खर्च - दरवर्षी साठवणीचे शुल्क - ३२००० ते ६४००० रुपये.

फ्रीजिंगमधून बाहेर
जेव्हा महिला आई होण्याचा निर्णय घेते, तेव्हा बिजांड स्टोरेजमधून बाहेर काढले जातात. ७५- ८०% अंडे पघळवल्यानंतर वाचतात.

फर्टिलायजेशन डॉक्टर फ्रीजिंग मधून बाहेर काढल्यानंतर अंड्यांना शुक्राणूंसोबत फर्टिलाइज करून भ्रूण बनवतात. परीक्षणानंतर त्याचे गर्भाशयात रोपण करतात.
खर्च - एक लाख ९०००० ते तीन लाख ८०००० रुपये.
पुढील स्लाइडवर वाचा, आतापर्यंत किती प्रयोग झाले..
बातम्या आणखी आहेत...