आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम विरोधी वक्तव्य: US नेते ट्रम्प यांना UK मध्ये प्रवेशबंदीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अमेरिकेमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदीची मागणी करणारे रिपब्लिकन नेते डोनॉल्ड ट्रम्प यांच्या विरोधी सूर वाढला आहे. ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये प्रवेश बंदी करावी यासाठी, जवळपास 2.5 लाख लोकांनी स्वाक्षरी करुन याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे, स्कॉटिश विद्यापीठाने ट्रम्प यांना दिलेली पदवी परत घेतली आहे.

काय म्हणाले होते ट्रम्प
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवाराच्या शर्यतीत ट्रम्प आघाडीवर आहेत. ते मंगळवारी म्हणाले होते, 'अमेरिकेत मुस्लिमांवरील प्रवेश बंदी तोपर्यंत कायम राहिली पाहिजे, जोपर्यंत कळत नाही की देशात हे काय चालले.'
- याआधी ट्रम्प यांनी अमेरिकेत मशिदी बंद करण्याचा आणि मुस्लिमांवर कडक नजर ठेवण्याचाही सल्ला दिला होता.

का केले असे वक्तव्य
- गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सॅन बर्नार्डिनोच्या कम्युनिटी सेंटरवर गोळीबार झाला होता. त्यात 14 लोक मृत्यूमुखी पडले होते.
- हल्लेखोर दाम्पत्य सैय्यद फारुख आणि तश्फीन मलिक मुळचे पाकिस्तानातील असल्याचे म्हटले जाते.
- या घटनेच्या पार्श्वभूमीकवर टम्प यांनी वक्तव्य केले. त्यांनी जगभरातील वाढत्या इस्लामिक कट्टरवादाचा संदर्भ देत हे वक्तव्य केले होते.
- फ्लोरिडाचे सेंट पीटर्सबर्गचे महापौर रिक क्रिसमॅन यांनी आपल्या शहरात येण्यास ट्रम्प यांना बंदी घातली आहे. त्यानंतरही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

ट्रम्प यांची अपक्ष लढण्याची तयारी
>> या वक्तव्यानंतर ट्रम्प यांच्यावर होत असलेल्या चौफेर टीकेनंतर त्यांनी आता रिपब्लिकन पक्ष सोडण्याची धमकी देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. 70 टक्क्यांहून अधिक मतदार आपल्या पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

>> अमेरिकेचा सुरक्षा विभाग असलेल्या पेंटागॉनने ट्रम्प यांचे मुस्लिमविरोधी वक्तव्य अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे म्हटले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनुसार हे मुस्लिमविरोधी वक्तव्य अमेरिकी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

>> संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाचे उच्चायुक्त झैद राद अल हुसेन यांनी ट्रम्प यांचा हा सल्ला अत्यंत बेजबाबदारपणा असल्याचे म्हटले आहे. यामुळे दहशतवादाचा बळी ठरणारा सामान्य मुस्लिम माणूसही दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर नाचू लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे

ट्रम्प यांचे ब्रिटनशी नाते
- ट्रम्प ब्रिटनला येत-जात राहातात. त्यांचे स्कॉटलँड येथे दोन गोल्फ कोर्स आहे. गेल्या वर्षीच त्यांनी येथे भेट दिली होती.
- मात्र त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी वाढली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ट्रम्प यांच्या विरोधातील आंदोलन
बातम्या आणखी आहेत...