आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प म्हणाले, प्रेसिडेंट बनलो तर हिलरींना जेलमध्ये टाकणार, असे झाले Debate

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - यूएस प्रेसिडेंशियल इलेक्शनअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात सोमवारी दुसरे डिबेट झाले. सेंट लुईसच्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आले होते. हिलरी आणि ट्रम्पने हात न मिळवतातच, डिबेट सुरू केले. टाउन हॉलसारखे हे डिबेट होते. यात ऑडियन्सनेही प्रश्न विचारले. हिलरी म्हणाल्या, 'ट्रम्प यांच्या लीक झालेल्या व्हिडीओने त्यांचे सत्य समोर आले आहे. त्यावर ट्रम्प म्हणाले, ही खासगी चर्चा होती, मलाही त्याचा अभिमान नाही. हिलरी यांनी ट्रम्प यांच्यावर रशियाबरोबर डील केल्याचा आरोप लावला. ट्रम्प म्हणाले माझी कोणतीही डील झाली नाही. ट्रम्प म्हणाले मी प्रेसिडेंट बनलो तर ईमेल मुद्यावर हिलरीला तुरुंगात टाकेन.
डिबेटचे अपडेट्स..
8:05 AM:दुसरे प्रेसिडेंशियल डिबेट संपले.
7:50 AM:हिलरींबाबत काय अवडते यावर ट्रम्प म्हणाले, त्या फायटर आहेत, अखेरपर्यंत मैदानात टिकून राहतात.
7:40 AM:ट्रम्पबाबत काय आवडते यावर हिलरी म्हणाल्या, मला त्यांची मुले आवडतात.
7:35 AM:हिलरी म्हणाल्या ट्रम्प यांचे टॅक्स प्लॅन अमेरिकेला मंदीच्या दरीत नेतील.
7:30 AM:आपण इस्लामबरोबर युद्ध करू शकत नाही - हिलरी
7:20 AM:मी प्रेसिडेंट बनलो तर ई मेल मुद्द्यावर हिलरींना तुरुंगात पाठवेन. परराष्ट्र मंत्री असताना हिलरींनी प्रायव्हेट सर्व्हरमधून ईमेल पाठवल्याचा आरोप आहे.
7:17 AM: ट्रम्प म्हणाले, तुम्ही का काही करत नाही. हिलरी म्हणाल्या, मी रिपब्लिकन प्रेसिंडेंटच्या काळात सिनेटर होते.
7:15 AM: ट्रम्प म्हणाले इस्लामला घाबरणे हे लज्जास्पद.
7:05 AM: मुस्लीम दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकन्स मोठ्या संख्येन मदत करू इच्छितात.
7:00 AM: निवडून आलो तर हिलरीच्या ईमेल्सची चौकशी करणार असे ट्रम्प म्हणाले.
6:58 AM: ट्रम्प आपले प्रेसिडेंट बनण्याच्या लायकीचे नाहीत - हिलरी
6:55 AM: ट्रम्प म्हणाले, बिल क्लिंटन महिलांचा अपमान करायचे.
6:46 AM: हिलरी म्हणाल्या, आपण अनेकदा ट्रम्प यांना महिलांचा अपमान करताना पाहिले आहे.
6:45 AM: मी कधीही रिपब्लिकन पार्टीच्या लोकांच्या कामाच्या क्षमतेवर संशय घेतला नाही - हिलरी
6:44 AM: ट्रम्प म्हणाले, मी अमेरिकेला पुन्हा अधिक चांगले आणि सुरक्षित बनवेल.
6:42 AM: ट्रम्प म्हणाले, मी महिलांचा आदर करतो, माझ्या एवढा महिलांचा आदर कोणीही करत नसेल.
6:41 AM: ट्रम्प म्हणाले, सत्तेत आलो तर IS बरोबर योग्य पद्धतीने लढेल.
6:40 AM: हिलरी क्लिंटन म्हणाल्या, मी याबाबतीत पॉझिटिव्ह आहे की, अमेरिकन्स एकत्रितपणे चांगले काम करू शकतात.
6:40 AM: ट्रम्प म्हणाले, बिझनेस आणि ट्रेड सेक्टरमध्ये अमेरिकेची कामगिरी वाईट होत आहे.
6:38 AM: मी जिंकले तर प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला सोबत घेऊन काम करेल.
6:37 AM: हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यात दुसरे डिबेट सुरू.
बातम्या आणखी आहेत...