आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secular Blogger Ananta Bijoy Das Killed In Bangladesh

बांगलादेश: कट्टरतेविरुद्ध लिहिणाऱ्या आणखी एका Bloger ची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंत बिजॉय दास - Divya Marathi
अनंत बिजॉय दास
ढाका - उत्तर-पूर्व बांगलादेशच्या सिलहट शहरात धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात लिहिणाऱ्या आणखी एका ब्लॉगरची हत्या करण्यात आली आहे. अनंत बिजॉय दास असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी काही लोकांनी धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली.
गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये कट्टरतावादाविरोधात लिहिणाऱ्यांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात कट्टरपंथी संघटना आणि मुद्द्यांवर लिहिणारे अविजीत रॉय यांची ढाक्यात खुलेआम हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर मार्चमध्ये आणखी एक ब्लॉगर वशीकुर रेहमान यांची ढाक्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मदरशातील दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती.

हत्येचे नवे प्रकरण बांगलादेशची राजधानी ढाकापासून सुमारे 240 किलोमीटर अंतरावर घडले आहे. स्थानिक पोलिसांचे उपायुक्त फैसल महमूद यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "मास्क घातलेल्या दोन हल्लेखोरांनी मंगळवारी सकाळी 8.30 वाजता अनंत बिजॉय दास यांच्यावर मांस कापण्याच्या चाकुंनी हल्ला केला. आम्हाला ते लेखक असल्याचे समजले आहे, असे ते म्हणाले. त्याचवेळी बांगलादेश ब्लॉगर असोसिएशनचे प्रमुख इम्रान सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार दास हे नास्तिक होते. ते 'मुक्त मन' साठी ब्लॉग लिहायचे. तर याआधी हत्या झालेले अविजित रॉय हे हा 'मुक्त-मन' ब्लॉग चालवायचे. ते बांगलादेशी वंशाचे होते आणि काही वर्षांपासून अमेरिकेत राहत होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्लॉगर अविजित रॉय यांच्या हत्येचे PHOTO