आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secular Blogger Ananta Bijoy Das Killed In Bangladesh Latest News In Marathi

हत्यासत्र: बांगलादेशमध्ये आणखी एका ब्लॉगरची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व असते; परंतु बांगलादेशमध्ये एका ब्लॉगरची हत्या झाल्याची घटना मंगळवारी उजेडात आली आहे. अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी ब्लॉगरवर हा हल्ला केला. ईशान्य बांगलादेशातील ही घटना आहे. हत्येमागे इस्लामिक कट्टरवादी असून ब्लॉगरच्या हत्येची ही फेब्रुवारीपासूनची तिसरी घटना आहे.

अनंता बिजॉय दास असे मृत ब्लॉगरचे नाव आहे. सिल्हेट शहरात मंगळवारी सकाळी दास यांच्या घराजवळच हा हल्ला झाला. दास कार्यालयाकडे निघालेले असतानाच त्यांच्यावर हल्लेखोरांना मागून कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यानंतर दास घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दास यांची आेळख एक लेखक म्हणून होती. ‘भौतिकवाद आणि तार्किकता’ या विषयात त्यांनी लिहिलेले लेख उद््बोधक ठरल्याचे दास यांचे घनिष्ठ मित्र शहिदुझ्झामान पापलू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ब्लॉग्जवर त्यांनी अनेक वादग्रस्त विषय हाताळले होते. विशेष म्हणजे अविजित रॉय यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावनादेखील त्यांनी लिहिली होती. राॅय हे कट्टरवाद्यांचे बळी आहेत. एकाच वर्षात कट्टरवाद्यांनी तीन जणांची हत्या केली आहे. फेब्रुवारीमध्ये ४५ वर्षीय रॉय यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात त्यांची पत्नीचे प्राण वाचले होते.

देशातील तिसऱ्या घटनेने खळबळ
अल-कायदाशी कनेक्शन असल्याचा दावा

नास्तिकवाद्यांना लक्ष्य करणाऱ्या गटाचे अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी जवळचा संंबंध असावा, असा तपास अधिकाऱ्यांचा संशय आहे. गेल्या महिन्यात अमेरिकी तपास अधिकारी बांगलादेशच्या तपास यंत्रणेसोबत रॉय हत्येच्या तपासात सक्रिय सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्यात जलदगती तपास पथकाने रॉय हत्येप्रकरणी मुख्य संशयितांपैकी असलेल्या फाराबी शाफीर रहेमान यास अटक केली. रहेमानने राॅय यांना फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. तशी कबुलीही रहेमानने दिली होती.