आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sedition Case On Bangaladesh Former Prime Minister Khaleda Zia

माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्यावर देशद्रोहाचा खटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांच्यावर सोमवारी देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर १९७१ च्या मुक्तिलढ्यातील शहिदांबद्दल निंदनीय वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राजधानीतील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे हा खटला दाखल झाला आहे. शहिदांच्या अवमानाबद्दल खालिदा यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे, असे कोर्टाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अटक वॉरंटवरील सुनावणी उशिरा होणार आहे. गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी एका जाहीर कार्यक्रमात ७० वर्षीय खालिदा यांनी हे वक्तव्य केले होते. पाकिस्तानच्या विरोधातील युद्धात नेमक्या किती व्यक्ती शहीद झाल्या, याबद्दल वाद आहेत. एवढेच नव्हे, तर हा वाद सांगणारी अनेक पुस्तके आहेत. त्याचबरोबर दस्तऐवजही आहेत, असे त्यांनी म्हटले होते. खालिदा यांचा बीएनपी पक्ष कट्टरवादी गट जमात-ए-इस्लामीचा सहकारी असल्याचे मानले जाते. खालिदा यांनी शहिदांच्या बलिदानावर व्यक्त केलेले प्रश्नचिन्ह सत्ताधारी अवामी लीगला आवडले नाही. त्यांनी खालिदा यांच्यावर कडवी टीका केली. त्यातून हा वाद आणखी पेटला. दरम्यान, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील नऊ महिने चाललेल्या रक्तरंजित संघर्षात सुमारे ३० लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाची स्थापना कट्टरवादी विचारातून झाली आहे. देशातील जमात-ए-इस्लामी गटाशी बीएनपीची जवळीक आहे, हे उघड आहे. जमात-ए-इस्लामीने स्वतंत्र राष्ट्राच्या स्थापनेला विरोध केला होता. पाकिस्तानातून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळू नये, असे विचार जमात-ए-इस्लामीने मांडले होते.

खालिदा झिया यांनी केलेल्या वक्तव्यात राजद्रोहासारखे काहीही आक्षेपार्ह नाही, असा दावा बीएनपीचे वकील खंडकेर महबूब हुसेन यांनी रविवारी केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी झाली खटल्याला सुरुवात...
- काय होऊशकते शिक्षा...
- खालिदा ‘पाकिस्तानी एजंट’ आहेत का...